वनस्पतिशास्त्रावर कार्यशाळा

By admin | Published: June 2, 2016 02:38 AM2016-06-02T02:38:28+5:302016-06-02T02:38:28+5:30

स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथे विद्यापीठस्तरीय बी.एस.सी.च्या वनस्पतिशास्त्र चॉईस बेसड क्रेडीट सिस्टीम (सीबीसीएस)

Workshops on Botany | वनस्पतिशास्त्रावर कार्यशाळा

वनस्पतिशास्त्रावर कार्यशाळा

Next

नागभीड: स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथे विद्यापीठस्तरीय बी.एस.सी.च्या वनस्पतिशास्त्र चॉईस बेसड क्रेडीट सिस्टीम (सीबीसीएस) बी.एस.सी. वनस्पतिशास्त्राची अभ्यासक्रमसंदर्भात कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल एन. कोरपेनवार यांच्या उपस्थितीत झाली.
प्रस्तुत कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. सी.ए. निखाडे, तर कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. मृणाल काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अमीर धम्माणी, डॉ. एम. बी. वाडेकर, डॉ. सुरेश रेवतकर आणि अभ्यास मंडळ सदस्य यांची उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल एन. कोरपेनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा झाली.
या कार्यशाळेत विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विषयाच्या असंख्य प्राध्यापकांनी अभ्यासक्रमासंबंधी चर्चा करुन अभ्यासक्रमास अखेरचे स्वरूप प्राप्त करुन दिले. कुलगुरु डॉ. कल्याणकर यांनी नवीन अभ्यासक्रम सीबीसीएसनुसार सुरु करुन उच्च प्रतिचे व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार इतर शाखेच्या विषयांचे शिक्षण घेता येते, असे निर्देश केले. कार्यशाळेत डॉ. काळे यांनी अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती पॉवर प्रेजेंटेशनद्वारे दिली.
सदर कार्यशाळेचे संचालन डॉ.देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. वाडेकर यांनी केले. कार्यशाळेस डॉ. मोहतुरे, डॉ. प्रा. गोडे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Workshops on Botany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.