‘आमच गाव, आमचा विकास’ अंतर्गत चिरोली येथे कार्यशाळा

By admin | Published: July 6, 2016 01:11 AM2016-07-06T01:11:40+5:302016-07-06T01:11:40+5:30

१४ व्या वित्त आयोगाअंतर्गत ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसंसाधन गटातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण ...

Workshops here under 'Our Village, Our Development' at Chiroli | ‘आमच गाव, आमचा विकास’ अंतर्गत चिरोली येथे कार्यशाळा

‘आमच गाव, आमचा विकास’ अंतर्गत चिरोली येथे कार्यशाळा

Next

चिरोली : १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसंसाधन गटातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमाची कार्यशाळा सोमवारी स्थानिक महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात पार पडली.
या कार्यशाळेत सन २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षात लोक सहागातून नियोजन प्रक्रिया पार पाडण्यासाठी, गावाचा विकास आराखडा तयार करुन केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून प्राप्त विधच्या कामाचे नियोजन करणे व गावातील संपूर्ण वंचित घटक, अनु. जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग, अल्प व अत्यल्प भुधारक या सर्व लोकांचा सहभागातून गावाचा विकास करणे, मानके व निर्देशांकाअंतर्गत आरोग्य शिक्षण व रोजगार निर्मिती या घटकांवर भर देवून त्यांचे जिवनमान उंचावण्याच्या दृष्टीकोणातून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेला प्रशिक्षणार्थी म्हणून केळझर गणातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, अंगणवाडीसेविका, शिक्षक, आरोग्य सेवक , सेविका, वनरक्षक, आशा वर्कर व रोजगार सेवक उपस्थित होते.
कार्यशाळेत प्रशिक्षक बालाजी बावणे, जे. के. राऊत यांनी मार्गदर्शन केले. संचालन बी. जे. मेश्राम व आभार एस. बी. बलवार यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Workshops here under 'Our Village, Our Development' at Chiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.