जागतिक वारशाच्या मूर्र्तींची स्वच्छता
By admin | Published: April 19, 2017 12:40 AM2017-04-19T00:40:16+5:302017-04-19T00:40:16+5:30
‘जागतिक वारसा दिन’निमित्त ‘इको-प्रो’ संस्थेच्या इको-प्रो पुरातत्व संवर्धन शाखेने एतिहासिक वास्तु स्वच्छता व संवर्धनाबाबत मंगळवारी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला.
‘इको-प्रो’चाउपक्रम : किल्ला स्वच्छता अभियानाचा ४५ वा दिवस
चंद्रपूर : ‘जागतिक वारसा दिन’निमित्त ‘इको-प्रो’ संस्थेच्या इको-प्रो पुरातत्व संवर्धन शाखेने एतिहासिक वास्तु स्वच्छता व संवर्धनाबाबत मंगळवारी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. यावेळी हनुमान खिडकी, किल्ला परिसर व लालपेठ-मातानगर भागातील अपूर्ण देवालयाच्या मूर्ती असलेला परिसर स्वच्छ केला.
जगभरातील सुदंर आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण प्राचीन वास्तुना संरक्षण देणे आणिया वास्तुविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिल ‘जागतीक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. चंद्रपूर शहर व जिल्ह्यात मोठया प्रमाणात ऐतिहासिक वास्तु असून त्यात चंद्रपूरचा किल्ला, राजा बीरशहाची समाधी, अपूर्ण देवालय, विविध मंदिरे अस्तित्वात आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना इको-प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले की, आज आपण आपल्या स्वाथार्साठी, गरजेपोटी या ऐतिहातिक वारसा नष्ट करीत आहोत. त्याच्या संरक्षणासाठी आता लोकलढा उभा राहिला पाहिजे. या वास्तु खंडहर आणी अतिक्रमण होण्यापासून वाचविणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. तर प्रा डॉ इसादास भडके यांनी सांगितले की, आपला गोंडकालीन इतिहास आणि ऐतिहासिक वारसा किल्लाच्या बुरूजाप्रमाणे ढासळत चालला आहे. त्याचे संवर्धन करणे आपले सर्वांचेच काम आहे. याकडे पुरातत्व विभागानेसुध्दा योग्य लक्ष घालून संवर्धन केले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.या कार्यक्रमात प्रशांत बोराडे, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, अब्दुल जावेद, विनोद दुधनकर, संजय सब्बनवार, सुमित कोहळे, राजू काहीलकर, बिमल शहा, सौरभ शेटये, हेंमत बुट्टन, हरिदास कोराम, आशू सागोळे, प्रमोद देवांगण, सचिन धोतरे, महेश होकर्णे, आशिष मस्के, सागर कावळे, अब्दुल हंफी आदींसह मातानगर अपूर्ण देवालय परिसरातील स्थानिक युवंक उपस्थित होते. (प्रतिनिधी)