सोशल मीडियाचे जगच आभासी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:00 PM2018-06-30T23:00:59+5:302018-06-30T23:01:53+5:30

सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवले. कोणत्याही क्षणी हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आनंद व दु:खाचे क्षण, मनातील असंख्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यामध्ये सहभागी करून घेण्याचे व्यासपीठ या नवतंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिले. पण शेवटी हे तंत्रज्ञान आहे. स्वत:च्या मर्जीने चालूच शकत नाही. तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करतो यावरच त्याची उपयोगीता ठरत असते़ मात्र, केवळ थ्रिल अनुभवण्याच्या नादात सोशल मिडियाच्या आभासी जगण्यावर भाळल्यास आयुष्याचे प्रचंड नुकसान होते.

The world of social media is virtual? | सोशल मीडियाचे जगच आभासी?

सोशल मीडियाचे जगच आभासी?

googlenewsNext
ठळक मुद्देजागृत तरुणाईचे मत : सुसंवाद व बौद्धिक विकासासाठी व्हावा तंत्रज्ञानाचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवले. कोणत्याही क्षणी हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आनंद व दु:खाचे क्षण, मनातील असंख्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यामध्ये सहभागी करून घेण्याचे व्यासपीठ या नवतंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिले. पण शेवटी हे तंत्रज्ञान आहे. स्वत:च्या मर्जीने चालूच शकत नाही. तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करतो यावरच त्याची उपयोगीता ठरत असते़ मात्र, केवळ थ्रिल अनुभवण्याच्या नादात सोशल मिडियाच्या आभासी जगण्यावर भाळल्यास आयुष्याचे प्रचंड नुकसान होते. त्यापासून सावध राहिले पाहिजे, असे मत जागृत तरूणाईने सोशल मिडिया दिनानिमित्त ‘लोकमत’ शी संवाद साधताना व्यक्त केले.
मोबाईलचा शोध लागल्यानंतर मानवी जीवनाचे क्षितीज विस्तारले. हाताच्या मुठीत संपूर्ण जग अवतरल्याचा आविर्भाव व्यक्त होवू लागला. स्मार्टफोनचा उदय होताच फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, इंस्टाग्राम, टिष्ट्वटरने जगभरात व्यक्त होण्याची संधी मिळाली. पण, हा सोशल मीडिया नेमका कसा हाताळावा, त्याचे परिणाम काय होवू शकतात, काय टाळावे, काय स्वीकारावे हे अजूनही अनेकांना समजले नाही. हातातल्या स्मार्टफोनवर इंटरनेटचा पॅक आला़ लॅपटॉपवर इंटरनेट कनेक्शन मिळाल्याने सोशल मीडिया जणू कसाही वापरण्याचा परवाना मिळाला, अशी मानणारी पिढी आज तयार होत आहे. सोशल मिडिया एक शस्र आहे़ ते कसे वापरले जाते, यावरच त्याची उपयुक्तता आणि घातकता ठरविता येते. मागील एक दशकांत फोफावलेला सोशल मीडियाच्या नव्या अवताराविषयी काय वाटते? सोशल मीडियाचे व्यसन का लागते? या तंत्रज्ञानाच्या वापरावर निर्बंध आणण्याची गरज आहे का? फेसबुक व टिष्ट्वटरवर पोस्ट आल्यास तो अंतिम शब्द मानून स्वत:च्या आयुष्यावर परिणाम करण्याची गरज आहे का? व्हॉटस्अप, फेसबुक किंवा टिष्ट्वटरचे व्यसन लागल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याची आपली मानसिक तयार आहे, यासारखे अनेक प्रश्न पुढे येत आहेत़ अवस्थ करणाºया प्रश्नांविषयी जागृत तरूणाई, विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य सोशल मीडिया दिले. चांगल्या भावना दुसºयांपर्यंत पोहोचविणे व त्यामध्ये सहभागी करून घेणे, यासाठी सोशल मीडियाचा व्यासपीठ खूप होत आहे. परंतु, विवेकबुद्धी शाबूत नसली तर माणुसकी हरवण्याच्या घडू शकतात़ सोशल मिडियावरील आभासी जगण्यावर भाळणे अत्यंत चुकीचे आहे, असा सूर या संवादातून उमटला़
सायबर गुन्ह्यांत वाढ
शहरांसोबतच ग्रामीण भागातही स्मार्टफोन स्मार्ट वापरणाºयांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ प्राथमिक शाळा शिकणाºया विद्यार्थ्यांकडे आता स्मार्टफोन स्मार्ट आढळते़ मात्र, अभ्यासक्रमात या नव्या संवाद माध्यमाचे लाभ-तोटे कळावे, याविषयी अभ्यासक्रमात काहीच उपलब्ध नाही़ त्यामुळे या साधनांचा माहिती व ज्ञानाऐवजी चुकीच्या कामांसाठी वापर होतोय़ यातूनच सायबर क्राईम घडत आहेत़ त्यावर वेळीच जागृती झाली नाही तर येत्या काही वर्षांत गुन्ह्यांचे प्रमाण पुन्हा वाढेल, असे मत अभ्यासक श्रीकांत चौधरी यांनी व्यक्त केले़

सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे. यातून ब्लॅकमेलींगच्या घटना वाढत आहे. या साधनांचा वापर करतांना सामाजिक भान ठेवले पाहिजे. युवक-युवती चुकीच्या मार्गावर जावू शकतात. अभ्यासाही दुर्लक्ष होते. कौटुंबीक वाद वाढतात़ दंगली घडतात़ त्यामुळे या माध्यमांविषयी साक्षरता वाढविण्याची आवश्यकता आहे.
-डॉ. विवेक बांबोळे,
मानसोपचार तज्ज्ञ चंद्रपूर

सोशल मीडियाचे फायदे व तोटे समजून घेण्याची गरज आहे. सोशल मीडियावर आभासी ओळख निर्माण करणे सोपे जाते. बोगस अकाउंट उघडून टोपण नावाने टाकलेली पोस्ट सहसा कुणाला कळत नाही. यातूनच गुन्हेगारीला सुरुवात होते. यातून वैयक्तिक माहितीचाही गैरवापर होण्याची शक्यता आहे. युवक-युवतींनी यापासून सावध राहावे. इतरांनाही सावध करावे़
-शांतीभूषण बोरकर, चंद्रपूर

'सोशल मीडिया हा आपल्या विचारांना बिनधास्तपणे अभिव्यक्त करण्याचे व्यासपीठ आहे. ही विज्ञानाची देगणी आहे़ याचा उपयोग सामाजिक एकात्मता व बंधुभाव वाढविण्यासाठी करावा. चुकीच्या पद्धतीने वापर करून स्वत: व समाजातील कुणाचेही नुकसान करू नये. वृत्तपत्र हे अधिक विश्वसनिय आहेत़
- सूरज गुरूनुले, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

एकमेकांच्या थेट संपर्कात नसले तरी फेसबुक व व्हॉटस्अ‍ॅपसारखी साधने जवळ आणतात. आपसातील बºयाच गोष्ठी न भेटताही एकमेकांना माहित होतात. युवापिढीने या आधुनिक साधनांचा चांगल्या कामासाठीच वापर केला पाहिजे. मुलांना मोबाईल घेवून देताना पालकांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी.
-गुरूदीपसिंग वधावन
तुकूम चंद्रपूर

क्षणाचाही विलंब न लावला सहजपणे कोट्यवधी नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे हे प्रभावी साधन आहे. या आधुनिक साधनांचा वापर करून गरीबी, अज्ञान, बेरोजगारी, आरोग्याचे प्रश्न, आदिवासी, ग्रामीण भागाातील समस्या तसेच शेतकºयांचे प्रश्न सरकारच्या लक्षात आणून दिले पाहिजे.
-श्यामसुंदर गोहणे, चंद्रपूर

मोबाईलद्वारे एका कॉलसाठी जेवढे पैसे लागत नाही. त्याहीपेक्षा अगदी कमी पैशांत एकमेकांशी संवाद साधण्याचा आनंद घेता येतो. ही साधने विज्ञानाने दिलीत. त्यामुळे स्वत:च्या जगण्यातही विज्ञाननिष्ठा व मानवतेचे मूल्ये आचरणात आणण्याची गरज आहे. तरच समाज प्रगत झाला असे म्हणता येईल़ अन्यथा तांत्रिक प्रगतीला अर्थ नाही़
-निलम बोरकर, चंद्रपूर

सोशल मीडियाचा विधायक वापर केला पाहिजे. तरुणांनी सोशल मीडियाची शक्ती ओळखावी़ चांगल्या कामांसाठी नवे तंत्रज्ञान स्वीकारावे़ भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाºया मूल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी संपर्क माध्यमांचा वापर करावा़ तरच करिअर घडू शकेल़
-अमोल गेडाम विद्यार्थी, चंद्रपूर

सोशल मीडियाचा गैरवापर करण्याचे प्रमाण फार वाढले. प्रक्षोभक व अश्लिल स्वरूपाचे संदेश व्हायरल होण्यापूर्वीच रोखण्यासाठी सरकारने कायदा तयार करावा. सोशल मीडियावर फिरणाºया पोस्ट्स पाहून मते बनवू नये. हिंसाचार भडकविणारे संदेश पोस्ट करू नये़ अन्यथा सोशल मीडिया गुन्ह्यांचे आगार बनू शकतो़
- प्रशांत खोब्रागडे, चंद्रपूर

Web Title: The world of social media is virtual?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.