२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जंतनाशक गोळ्या दिल्या का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:34 AM2021-09-16T04:34:46+5:302021-09-16T04:34:46+5:30
बॉक्स काय आहे जंतदोष केवळ दूषित पाण्यातून, अन्नातूनच नव्हेतर, मातीतून संक्रमित होणारे परोपजीवी जंत दूषित अन्न, हाताद्वारे पसरतात. जंतसंसर्ग ...
बॉक्स
काय आहे जंतदोष
केवळ दूषित पाण्यातून, अन्नातूनच नव्हेतर, मातीतून संक्रमित होणारे परोपजीवी जंत दूषित अन्न, हाताद्वारे पसरतात. जंतसंसर्ग झालेली व्यक्ती उघड्यावर शौचास बसल्यास हे जंतू शौचावाटे मातीत मिसळतात. फळे आणि भाज्या न धुता खाणे किंवा त्या कच्च्याच खाणे, शौचानंतर हात न धुणे यामुळे संसर्ग होतो. जंतांनी शरीरात प्रवेश केला की, ते आतड्यात प्रवेश करतात. त्याला धरून ठेवतात आणि पोषक आहार खायला सुरुवात करतात.
बाॅक्स
वयाच्या १८ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
एक वर्षाच्या मुलापासून १८ वर्षांच्या मुलाला जंतनाशक गोळी दिली जाते. ही गोळी पाण्यात विरघळून द्यावी लागते. जिल्ह्यात या गोळ्यांचे वितरण करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
बाॅक्स
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
नागरिकांनी जंतनाशक गोळ्यांसाठी आशा वर्कर, आरोग्यसेविका किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. बालकांना जास्त त्रास होत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषध द्यावे.
कोट
१८ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना या गोळ्यांचे वितरण करण्यात येते. जिल्ह्यात हत्तीरोग मोहीम राबविण्यात आली. त्याच वेळेस जंतनाशक गोळ्यांचेही वितरण करण्यात आले. वर्षांतून दोनदा या गोळ्यांचे वितरण करण्यात येते. आता फेब्रुवारी महिन्यात या गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
- राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर
बॉक्स
आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप
जंतनाशक गोळ्यांचे वाटप हे आरोग्य विभागातर्फे केले जाते. शाळा ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रातून आरबीएसके मोहिमेद्वारे वयाच्या १८ वर्षांखालील मुलांना या गोळ्यांचे वितरण करण्यात येते. वर्षातून दोन वेळा राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येतो. त्याशिवाय जंतनाशक सप्ताहात या जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येते.