पालकांची चिंता वाढली
By admin | Published: July 9, 2014 11:23 PM2014-07-09T23:23:06+5:302014-07-09T23:23:06+5:30
ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने आदिवासींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी
आदिवासी विकास प्रकल्प : आदिवासी विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश
चंद्रपूर : ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने आदिवासींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणासाठी शासनाने भार उचलला आहे. मात्र शासनाकडून संस्थेला देण्यात येणारा भत्ता परवडत नसल्याचे कारण सांगून येथील संस्थेने विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला. मागील १० ते १२ दिवसांपासून सदर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची समस्या कायम आहे. दरम्यान, तात्पुरत्या स्वरुपात जुन्याच संस्थेत विद्यार्थी राहात आहे. मात्र आता पालकांची चिंता वाढली आहे.
आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील १२३ विद्यार्थ्यांना निवासी इंग्रजी शिक्षणासाठी येथील एका इंग्रजी मिंडियमच्या शाळेत प्रवेश दिला. या शाळेत विद्यार्थी आजपर्र्यंत शिक्षण घेत होते. मात्र सदर संस्थेने देण्यात येणारा निवासी भत्ता परवडत नसल्याचे कारण सांगून पालकांनी शाळेतून विद्यार्थ्यांना काढण्याचे सांगितले. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या काही सदस्यांनी मुंबई येथे आदिवासी विकास मंत्री तसेच सचिवांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात असलेली समस्या तात्पुरत्या स्वरुपात दूर झाली. मात्र कायम समस्या मिटली नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. यापूर्वी शासन ३२ हजार ५०० रुपये प्रती विद्यार्थी एका वर्षांसाठी खर्च करत होते. आता प्रती विद्यार्थ्यांसाठी ५० हजार रुपये खर्च करणार असल्याचे समजले. मात्र विभागाला अद्यापही जिल्हास्तरीय संस्था मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांची समस्या कायम आहे.(नगर प्रतिनिधी)