पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली
By admin | Published: August 21, 2014 11:47 PM2014-08-21T23:47:55+5:302014-08-21T23:47:55+5:30
सध्या उन्हाळ्यासारखी कडक उन्ह तापू लागली असून पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहेत.
मारोडा : सध्या उन्हाळ्यासारखी कडक उन्ह तापू लागली असून पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहेत.
खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला पावसाळा शेतकऱ्यांसाठी जीवनई ठरत असतो. परंतु यावर्षी पावसाअभावी धान उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. हेमंत वाळके नामक शेतकऱ्याने याविषयी माहिती दिली. तो म्हणाला, पहिल्या पेरणीत धान बियाणे उगवलेच नाहीत. त्यामुळे त्याने पुन्हा पऱ्हयाची पेरणी केली. या परिसरात केवळ एकदाच साधारण मोठा पाऊस झाला. त्यामुळे फार कमी शेतकऱ्यांची रोवणीची कामे झाली. सकाळी शेतकरी जागा होतो तेव्हा त्यांना प्रखर सूर्यप्रकाश पडलेला दिसतो. पाऊस नाही, शेतात पाणी नाही. काहींचे पऱ्हे नाही. रोवण्या जागच्या जागी खोळंबल्या. यावर्षी सार्वत्रिक पाऊस पडलाच नाही. कुठे पडला तर कुठे नाही. एकंदर स्थिती गंंभीर होत आहे. पावसाअभावी रोवण्या थांबल्या आहेत. त्यामुळे शेतमजुरही फारसे उत्साही नाहीत. याचे परिणाम शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत आहे. हाती पैसा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके, स्कूल बॅग नाही. रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी व शेतमजूर वर्ग फार अडचणीत आलेला आहे. त्यामुळे शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत (वार्ताहर)