अतिदुर्गम भागात विणले पक्क्या रस्त्याचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:35 PM2019-06-28T22:35:14+5:302019-06-28T22:35:37+5:30

आदिवासी बहुल, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक अतिदुर्गम गावामध्ये पक्क्य व खड्डेमुक्त रस्त्यांचे जाळे विणले गेल्याने प्रवासी व नागरिकांचा प्रवास सुखकर होत आहे.

Wrenches of pucca street netting in remote areas | अतिदुर्गम भागात विणले पक्क्या रस्त्याचे जाळे

अतिदुर्गम भागात विणले पक्क्या रस्त्याचे जाळे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : आदिवासी बहुल, अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक अतिदुर्गम गावामध्ये पक्क्य व खड्डेमुक्त रस्त्यांचे जाळे विणले गेल्याने प्रवासी व नागरिकांचा प्रवास सुखकर होत आहे.
निसर्गरम्य माणिकगड पहाडाच्या दºया खोर्या व पक्कडीगुड्डम जलाशयपासून जाणारा चनई- येरगव्हाण -धनकदेवी- जिवती हा २२ ते २५ किलोमीटरचा जवळपास पंधरा गावाला जोडणारा रस्ता आहे. त्याचे संपूर्ण डांबरीकरण व मजबुतीकरण झाल्याने कोरपना व जिवती या दोन्ही तालुका मुख्यालयाचे अंतर खूपच कमी झाले आहे. तसेच प्रवासातली दगडधोंड्याची मोठी अडचण दूर झाल्याने प्रवासही निसर्गपूर्ण वातावरणात आल्हाददायक व सुखकर बनला आहे. त्यामुळे येणाºया जाणाºया प्रत्येक वाटसरूकडून या रस्त्याच्या निर्मितीबाबत कौतुकास्पद गौरवउद्वार बाहेर पडतात. सदर मार्ग प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या निर्मितीमुळे अतिदुर्गम भागातील अनेक गावे मुख्य प्रवाहाशी जोडली गेली आहेत. जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार संजय धोटे यांचे प्रयत्नातून या रस्त्यासह तालुक्यातील अनेक अतिदुर्गम भागातील रस्त्याचे काम मार्गी लागले यात कवठाळा- इरई, कुसळ-बोरगाव-कमलापूर, वडगाव-रामपूर- निजाम गोंदी, वनसडी -पक्कडीगुड्डम, वनसडी- नारडा- कवठाळा फाटा - पवनी, माथा - शेरज मार्ग पक्या आणि मजबूत रस्त्यात रूपांतरित झाले आहे.

Web Title: Wrenches of pucca street netting in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.