हृदयाच्या तळमळीतूनच लेखन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:14 PM2018-01-29T23:14:40+5:302018-01-29T23:15:03+5:30
साहित्य हे जीवनाच्या धडपडीतून आणि ह्रदयाच्या तळमळीतून निर्माण झाली पाहिजे.
आॅनलाईन लोकमत
गोवरी : साहित्य हे जीवनाच्या धडपडीतून आणि ह्रदयाच्या तळमळीतून निर्माण झाली पाहिजे. समाजात जगताना दाहक आणि आल्हाददायक अनुभव येत असतात. मात्र, सामाजिक वास्तव साहित्यातून मांडत असताना हृदयाची तळमळ असावी लागते, असे मत प्रसिद्ध कादंबरीकार अशोक पवार यांनी व्यक्त कले. राजूरा येथील स्वामी विवेकानंद सभागृहात तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार वितरण व कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा अल्लूरवार यांनी उद्घाटन केले. स्वागताध्यक्ष उमाकांत धांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रावण बाळ योजनाचे अध्यक्ष सतीश धोटे, जि. प. सदस्य सुनील उरकुडे, नत्थू बोबडे, किशोर कवठे उपस्थित होते. अशोक पवार यांनी साहित्याच्या विविध प्रवाहांवर भाष्य केले. अष्टपैलू व्यक्तिमत्व साहित्यिक पुरस्कार डॉ. बळवंत भोयर, रामचंद्र धोटे स्मृती कादंबरी पुरस्कार आचार्य विजया मारोतकर, वाघुजी गावंडे स्मृती कथासंग्रह पूरस्कार डॉ. बाबुराव उपाध्ये, वामनराव गड्डमवार स्मृती समीक्षा पुरस्कार बाळू दुगदुमवार, शांताबाई बोबडे स्मृती काव्य पुरस्कार डॉ. माधव जाधव, हनुमंत चिल्लावार स्मृती आत्मकथन पुरस्कार डॉ. जयप्रकाश घुमटकर, तर कल्याण तेजस्विनी साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रीती वडनेरकर, डॉ. राजकुमार मुसने, अविनाश पोईनकर, प्रा. चित्रा देशमुख, नरेशकूमार बोरीकर आदींना प्रदान करण्यात आला. परिक्षक डॉ. अनंता सूर म्हणाले, साहित्यातून समाजातील वास्तव मांडावे. वास्तवदर्शी साहित्य अमर होईल. साहित्य हे समाजमन चेतविण्याचे काम करते. खºया साहित्यातून समाजाला दिशा मिळते, असे मत व्यक्त केले. संचालन वर्षा कोल्हे-जवळे व प्रास्ताविक संगीता धोटे यांनी केले. प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात पंढरपूर येथील कवयित्री स्वाती भोंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. यावेळी कवींनी बहारदार कविता सादर केल्या. संचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले. कार्यक्रमाला कवी, साहित्यिक आणि रसिक उपस्थित होते.