साहित्यिकांच्या लेखण्या विवेकनिष्ठ व्हाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:18 PM2019-03-16T22:18:24+5:302019-03-16T22:18:44+5:30
आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळद्वारा पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन चिमूर येथील शेतकरी भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी येथे शनिवारी आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्घ साहित्यिक व विचारवंत प्रा.दीपककुमार खोब्रागडे होते. उदघाटन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसीध्द नाटककार प्रेमानंद गज्वी, संघरामगीरीचे संघनायक भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, अॅड. भुपेश पाटील, सुरेश डांगे, डॉ.धनराज खानोरकर, साहित्यिक ना.गो.थुटे, आत्माराम ढोक, विद्याधर बन्सोड, प्रा. वामन शेळमाके, किशोर गजभीये, शुध्दोधन कांबळे, महेश मोरे उपस्थत होते.
क्रांतीभूमीत दोन दिवस चालनाऱ्या साहित्य संमेलनादरम्यान इंदिरा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राष्ट्रसंत साहित्यनगरीपर्यत प्रथम संविधान गौरवरॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी तुकडोजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा साकारून नागरिकांचे लक्ष वेधले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करून क्रांतीभूमीतील पहिल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.धनराज खानोरकर यांच्या ‘मास्तर मातीचे’ या काव्यसंग्रहाचे, डॉ. भुपेश पाटील यांच्या ‘जेव्हा गाव पेटून उठतो तेव्हा’, भानुदास पोपटे यांच्या ‘राष्ट्रीय अभंगवाणी’ या काव्यसंग्रहाचे व विद्याधर बन्सोड, अनंता सूर आदींचे पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
संमेलन परिसरात पुस्तकाचे स्टॉल
दोन दिवस चालणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नागरी परिसरात पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले असून अनेकजण येथून हजारोंची पुस्तके खरेदी करीत असल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी दिली.