जिल्हा परिषद लिपिकांचे लेखणीबंद आंदोलन
By Admin | Published: July 22, 2016 01:08 AM2016-07-22T01:08:07+5:302016-07-22T01:08:07+5:30
चंद्रपूर जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी १९ जुलैपासून लेखनीबंद आंदोलनात सहभागी झाले असून
कामे रेंगळाली: जि.प. कर्मचारी लिपीकवर्गीय कर्मचारी बेमुदत संपावर
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी १९ जुलैपासून लेखनीबंद आंदोलनात सहभागी झाले असून त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील सर्वच लिपीकवर्गीय कर्मचारी सहभागी झाल्याने अनेक कामे रेंगाळलेली आहेत. लिपीकवर्गीय संवर्गात सहायक प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारील ज्येष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक हे कर्मचारी सहभागी आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी १५ जुलैपासून लेखनी बंद आंदोलन सुरु केले. परंतु चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी न झाल्याने महाराष्ट्रात केवळ चंद्रपूर जिल्हा परिषदेचे लिपीकवर्गीय कर्मचारी सहभागी नाहीत, असे दृष्य दिसत होते. मात्र जि.प. लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे अध्यक्ष अजय टेप्पलवार यांनी तातडीने सर्व लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांची सभा घेतली. त्यात लेखनीबंद आंदोलनात सहभागी व्हावे किंवा नाही, याबाबत मते जाणून घेतले. कर्मचारी महासंघातर्फे सरचिटणीस प्रकाश सुरमवार यांनी कर्मचाऱ्यांना मतभेद व संघटनेतील वाद बाजूला ठेऊन एकजुटीने लेखनीबंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रमुख पदाधिकारी इंदूताई कोटनाके, अजय डोर्लीकर, नंदकुमार गोल्हर राजकुमार चिकटे, लखदिवे, शरद रामटेके यांनी पुढाकार घेतला आहे.
बेमुदत लेखनीबंद आंदोलन मागण्यापूर्ण होईपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सातत्याने शासनाकडे लिपीकवर्गीयांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती करीत असताना मागण्या मान्य न झाल्याने खेलनीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे. (प्रतिनिधी)