गॅप न देता दहावी, बारावीचे विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:25 AM2021-03-20T04:25:57+5:302021-03-20T04:25:57+5:30
चंद्रपूर: कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी दहावी, बारावीची परीक्षा उशिरा घेण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा २९ ...
चंद्रपूर: कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी दहावी, बारावीची परीक्षा उशिरा घेण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा २९ एप्रिल, तर बारावीची परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मात्र, आजही पालकांमध्ये संभ्रम असून, काही पालक ऑफलाइन तर काहींची ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी सुरू आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलमध्ये या वर्षी विद्यार्थी संख्या कमी आहे. मात्र, या वर्षी गॅप देण्याची मानसिकता विद्यार्थ्यांची नाही.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आला. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे तासिका झाल्या नाहीत. याचा परिणाम आता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत होईल, असे शिक्षण तज्ज्ञांचे मत होते. मात्र, गॅप देण्याच्या मानसिकतेत विद्यार्थी नसून, येणाऱ्या संकटावर मात करून परीक्षा देण्याची तयारी ते करीत आहे.
दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या कालावधीत तर बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून होत आहे. कोरोना संकटामुळे मागील अनेक महिने शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे तासिका झाल्या नाहीत. बहुतांश शाळांना ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे दिले, परंतु यात आलेल्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जही भरले नाही. मागील वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी ३० हजार ७९८ विद्यार्थी तर दहावीच्या परीक्षेसाठी ३४ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या वर्षी बारावीमध्ये २८ हजार ७८९ तर दहावीमध्ये ३५ हजार ०८१ विद्यार्थी आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, २०२० मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा झाली. यामध्ये ९५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर दहावी पुरवणी परीक्षेसाठी ७३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
बाॅक्स
दहावीचे विद्यार्थी
३५,०८१ (२०२१)
३४,३५४ (२०२०)
बारावीचे विद्यार्थी
२८,७८९ (२०२१)
३,०७,९९८ (२०२०)
दहावीची परीक्षा
२९ एप्रिल ते २० मे
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे
बाॅक्स
अंतिम मुदतीनंतरच पुनर्परीक्षार्थी संख्या
दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परीक्षा अर्ज भरणे अजूनही सुरू आहे. विलंबाने परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरच नियमित व पुनर्परीक्षार्थ्यांची संख्या समजणार आहे. सध्या तरी परीक्षा विभाग केंद्र निश्चितीसाठी तयारी करीत आहे.
कोरोनामुळे विद्यार्थी संख्येत घट होईल, अशी चिन्हे होती. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये काही अंशीच विद्यार्थी संख्या घटली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ९५३ विद्यार्थी तर दहावीच्या परीक्षेला ७३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.