देवघाट येथील यात्रा उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:19+5:302020-12-26T04:23:19+5:30
त्यामुळे सदर यात्रा काळात कोणीही दुकाने लावू नये, असे आवाहन श्रीदत्त उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचा ...
त्यामुळे सदर यात्रा काळात कोणीही दुकाने लावू नये, असे आवाहन श्रीदत्त उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचे पाऊल म्हणून यात्रा रद्द करण्यात आली आहे.
---
कोरपना ते वणी मार्गाचे चौपदरीकरन करा
कोरपना : चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोरपना ते वणी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिक व वाहतूकदारकडून केली जात आहे. हा मार्गे नागपूर, अमरावती , वर्धा , यवतमाळ, वरोरा, घुघुस शहरे जोडली जात असल्याने या मार्गावर मोठी वाहतुकीची रेलचेल असते. तसेच परिसरातील सिमेंट, कोळसा, गिट्टीखदान उद्योगाची जड वाहतूक होते. सद्यस्थिती तील रस्ता अपुरा व कमी वाहतूक भार वाहणारा असल्याने या मार्गाचे चौपदरीकरण व राष्ट्रीय महामार्ग त रूपांतर होणे त्वरित गरजेचे आहे.
--
उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबितच
चंद्रपूर : जिल्ह्यातील गडचांदूर, देऊरवाडा, राजोली, बाबूपेठ, सिंदेवाही, अड्याळ टेकडी, मुल , राजुरा , गवराला, माजरी, घुगुस, नागभीड, ब्रह्मपुरी येथील रेल्वेमार्गावर उड्डाणपूल नाही. त्यामुळे या रेलचेल असलेल्या रस्त्यावर नागरिक व वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या अनुषंगाने त्या मार्गावर उड्डाणपुलाची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
नव्या रेल्वेमार्ग निर्मितीची गरज
चंद्रपूर : जिल्ह्यातील गडचांदूर ते आदीलाबाद, मूल ते गडचिरोली, चंद्रपूर ते चांदा फोर्ट , वरोरा ते उमरेड, नागभीड ते चिमूर, कायर ते कोरपना रेल्वे मार्ग निर्मितीची गरज आहे. मात्र याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यातील काही मार्गाची अनेकदा घोषणा सुद्धा करण्यात आली. परंतु आजवर एकही रूळ टाकण्यात आला नाही. त्यामुळे या मार्गाच्या निर्मितीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.