शिष्यवृत्ती वाटप करून वडिलाचे वर्षश्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:03 PM2019-06-24T23:03:18+5:302019-06-24T23:03:35+5:30
खोरिपचे नेते, माजी प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ते स्मृतिशेष महादेवराव डुंबेरे हे स्वत: गरीब गरजू, हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करायचे. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे आयपीएस पुत्र मिलिंद डुंबेरे यांनी ही परंपरा कायम जपली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खोरिपचे नेते, माजी प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ते स्मृतिशेष महादेवराव डुंबेरे हे स्वत: गरीब गरजू, हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करायचे. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे आयपीएस पुत्र मिलिंद डुंबेरे यांनी ही परंपरा कायम जपली आहे.
मागील तीन वर्षांपासून कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षणास शिष्यवृत्ती दिली आहे. यावर्षी १८ जून रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात चार गरजू विद्यार्थ्यांना १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.
स्मृतिशेष डुंबेरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून अनेकांची मदत करून त्यांना सक्षम केले. हेच कार्य आता त्यांचे पुत्र आयपीएस मिलिंद, धनंजय व राकेश करत आहेत. मंगळवारी झालेल्या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात अभियांित्रकीचा रोहित भसारकर, विद्या निकेतनची वैष्णवी चौधरी, रुचिता वडस्कर, एलटीवीच्या पायल बनकर यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी बीएसएनएलचे निवृत्त मुख्य अभियता श्रीकांत डुंबेरे, शासकीय आयटीआयचे प्राचार्य सुशील बुजाडे, निवृत्त टेलिकॉम अधिकारी श्यामराव गजभे, प्रा. प्रेमाजी डुंबेरे, राकेश डुंबेरे, धनंजय डुंबेरे, विनायक इंगले आणि रंगारी उपस्थित होते.