वर्षाकाठी ‘तो’ करतो साठ लाखांचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:34 AM2017-11-16T00:34:52+5:302017-11-16T00:35:11+5:30

कोणतेही दुकान नाही, कोणाला शटर खोल म्हणायचे नाही.

For the year, 'he' does the business of six million | वर्षाकाठी ‘तो’ करतो साठ लाखांचा व्यवसाय

वर्षाकाठी ‘तो’ करतो साठ लाखांचा व्यवसाय

Next

घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : कोणतेही दुकान नाही, कोणाला शटर खोल म्हणायचे नाही. मात्र अट एकच. रोज भ्रमंती करायची आणि या भ्रमंतीतून तो वर्षाला साठ लाख रूपयांचा व्यवसाय करीत आहे. वाटले ना आश्चर्य! पण हे सत्य आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग ते गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा असा प्रवास करून हा व्यवसाय केला जात आहे. जगदीश विठूजी स्वर्गे असे त्याचे नाव असून पुस्तकांची विक्री करणे हा त्याचा व्यवसाय आहे. स्वर्गे यांच्याकडे सर्वच प्रकारची पुस्तके उपलब्ध आहे. यात कायद्याची पुस्तके आहेत. वन, पर्यावरण, मानवी हक्क, स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके आहेत. बहुतेक सर्वच प्रकारची पुस्तके त्यांच्याजवळ असतात.
या पुस्तक विक्रीसाठी वर्षातील १२ महिन्यांपैकी स्वर्गे ११ महिने भटकंतीवरच असतात. त्यांच्याजवळ एक चारचाकी वाहन असून या वाहनात ते खचाखच पुस्तके भरतात. घरून निघाल्यानंतर ते तालुक्याच्याच ठिकाणी थांबतात.
तालुक्याच्या तहसील कार्यालय किंवा पंचायत समितीसमोर ते चार चाकी वाहनातच दुकान थाटतात. तीन-चार तासात पुस्तकांची विक्री केल्यानंतर ते दुसºया तालुक्याला जातात. जगदीश स्वर्गे हे गेल्या ३१ वर्र्षांपासून हा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका पालथा घातला आहे.

Web Title: For the year, 'he' does the business of six million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.