जिल्ह्यात यंदा फटाके विक्रीत ५० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:31 PM2018-11-12T22:31:19+5:302018-11-12T22:31:36+5:30

सणांचा राजा म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा सण फटाक्यांविना अधुराच आहे. बच्चे कंपनी तर दसऱ्यापासूनच फटाके फोडत असतात. परंतु यंदा फटाक्यांची विक्री दरवर्षीपेक्षा ५० टक्क्यांवर आली. याला कारण महागाई ठरल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

This year, the sales of crackers declined by 50 percent in the district | जिल्ह्यात यंदा फटाके विक्रीत ५० टक्क्यांनी घट

जिल्ह्यात यंदा फटाके विक्रीत ५० टक्क्यांनी घट

Next
ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्णयापेक्षा महागाई कारणीभूत : वस्तू व सेवा करामुळे वाढल्या किमती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सणांचा राजा म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा सण फटाक्यांविना अधुराच आहे. बच्चे कंपनी तर दसऱ्यापासूनच फटाके फोडत असतात. परंतु यंदा फटाक्यांची विक्री दरवर्षीपेक्षा ५० टक्क्यांवर आली. याला कारण महागाई ठरल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.
दिवाळीच्या ऐन तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर बंधने घालताना आवाजांची क्षमता आणि वेळ ठरवून दिली होती. परंतु या निर्णयाचा दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांवर परिणाम झाला असावा. पण चंद्रपूरसारख्या ठिकाणी त्याचा अजिबात परिणाम जाणवला नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी मनाला वाटेल त्या क्षमतेचे फटाके उडविले. मात्र, फटाके विक्रीवर ४० ते ५० टक्के परिणाम झाल्याचे व्यापारी सांगतात. याकरिता महागाई कारणीभूत असल्याची माहितीही व्यापाºयांनी दिली. वस्तू व सेवाकर (जीएसटी) याशिवाय व्यवहारातील पारदर्शकता यामुळे यावर्षी फटाक्यांचे भाव वाढले. शिवाय ऐनवेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही आला. यामुळे दरवर्षीपेक्षा फटाक्यांच्या दुकानांची संख्या यंदा कमी होती. दिवाळीच्या काही दिवस अगोदरपासूनच फटाक्यांच्या आवाजामुळे दिवाळीची चाहूल लागत असे. परंतु यंदा फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी चार-पाच तास फटाक्यांचे आवाज आले. मात्र, ही वेळ न्यायालयाने ठरवून दिलेली नव्हती. अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या आवाजांचे आणि कितीतरी वेळ फटाके वाजले. तरीही चंद्रपूरमध्ये मात्र कोणतीही कारवाई याबाबत झाली नाही. फटाके विक्रीबाबत व्यापाºयांशी संपर्क साधला असता जीएसटी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. जे काही व्यवहार करायचेत ते पारदर्शक पद्धतीनेच करावे लागतात. यामुळे फटाक्यांचे दर वाढले. शिवाय दैनंदिन गरजा भागविण्याशिवाय लोकांनाही अन्य कोणत्या विषयात रस राहिला नाही, असे निरीक्षण व्यापाºयांनी नोंदविले. काहीका असेना यंदा लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता अन्य दिवशी फटाके फोडण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: This year, the sales of crackers declined by 50 percent in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.