यंदाही गणेश मूर्ती विक्रेत्यावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:27 AM2021-08-29T04:27:26+5:302021-08-29T04:27:26+5:30
गडचांदूर : गणेश उत्सव १० ते १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाचे सावट मागील वर्षीपासून सुरु असल्यामुळे मूर्तिकारांवर चिंतेचे ...
गडचांदूर : गणेश उत्सव १० ते १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाचे सावट मागील वर्षीपासून सुरु असल्यामुळे मूर्तिकारांवर चिंतेचे सावट आहे. मूर्तिकार कमी उंचीची व कमी प्रमाणात मूर्ती तयार करुन ठेवत आहे.
वेळेवर काय होणार याची भीती मूर्तिकारांना सतावत आहे. यंदाही हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. मूर्तिकारांनी कमी उंचीच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे; परंतु यंदा गर्दी न करण्याच्या सूचना असल्याने या उत्सवावर परिणाम होणार आहे. गडचांदूर शहरात लहान मोठे मूर्तिकार गणपतीच्या मूर्ती तयार करीत आहेत.
कोट
कोरोनामुळे यंदाही मोठ्या मूर्तीचे ऑर्डर कमी आहे. दुसरीकडे माती, रंग, वेशभूषेचे साहित्यही महागले आहे. त्यामुळे या व्यवसायावर पोट भरणे कठीण होत आहे.
-देविदास शेंडे, मूर्तिकार गडचांदूर.
280821\img-20210828-wa0035.jpg
यंदा ही गणेश मूर्तिविक्रेत्यावर कोरोनाच सावट कायम.....