ताडोबातील येडा अण्णा निष्काळजीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:58 PM2018-02-25T23:58:38+5:302018-02-25T23:58:38+5:30

देश-विदेशात वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकेकाळी आपल्या रूबाबदारपणाने व ऐटीने पर्यटकांना भूरळ घालणाऱ्या आणि ताडोबा, मोहुर्ली जंगलात वर्चस्व गाजवणाºया ‘येडा अण्णा’ने रविवारी अखेरचा निरोप घेतला.

Yeda Anna's negligent victim of Tadoba | ताडोबातील येडा अण्णा निष्काळजीचा बळी

ताडोबातील येडा अण्णा निष्काळजीचा बळी

Next
ठळक मुद्देअनेक वर्षे घातली पर्यटकांना भूरळ : वेदनेने विव्हळत सोडले प्राण

आॅनलाईन लोकमत
चिमूर : देश-विदेशात वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकेकाळी आपल्या रूबाबदारपणाने व ऐटीने पर्यटकांना भूरळ घालणाऱ्या आणि ताडोबा, मोहुर्ली जंगलात वर्चस्व गाजवणाºया ‘येडा अण्णा’ने रविवारी अखेरचा निरोप घेतला.
वनविभागाने भान्सुली येथे मृत पावलेल्या वाघाचे नाव ‘येडा अण्णा’ ठेवले होते. ‘येडा अण्णा’ने काही महिन्यांपूर्वी ताडोबा क्षेत्र सोडून चिमूर वन परिक्षेत्रातील खडसंगी, भान्सुली जंगलात आपला मुक्काम ठोकला होता. मात्र दोन वाघांमध्ये अस्तित्वाच्या झुंजीत तो जखमी झाला. जखमी अवस्थेमुळे वाघाने भान्सुली जंगलात गाव तलावाशेजारी बस्तान मांडले होते. मात्र वन विभागाच्या जाचक नियम व अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे अखेर ‘येडा अण्णा’ उपचाराअभावी मृत्यू पावला.
ताडोबा मोहुर्ली जंगलात या वाघाचे अनेक वर्षे वास्तव्य होते. या दरम्यान, या वाघाने अनेक पर्यटक, गाईड व नागरिकांना दर्शन दिले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी या वाघाला येडा अण्णा असे नाव दिले होते. तर याच वाघाची शेपटी तुटलेली असल्याने ‘ब्रोकन टेल’ याही नावाने तो ओळखला जात होता.
जंगलाचा राजा असलेल्या येङा अण्णाने अस्तित्वासाठी झुंज देत आपले बस्तान नवीन भागात वळविले. या झुंजीत तो जखमी झाला. भान्सुली जंगलात मागील पाच दिवसांपासून जखमी अवस्थेत त्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता. वन विभाग जंगलाच्या प्राण्याचे रक्षक असल्याचे सांगण्यात येत असले तरी या वनराजाला उपचाराअभावी मरावे लागल्याने ते भक्षकही आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जंगलाच्या राजाला उपचाराअभावी आलेल्या मृत्युमुळे वन्यजीव प्रेमी व नागरिकांनी वन विभागाप्रति संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या सर्व प्रकराची आता सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
घटनास्थळाला आले जत्रेचे स्वरूप
भान्सुली गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावतलाव परिसरात जखमी अवस्थेत वाघ मागील पाच दिवसांपासून वास्तव्यास होता. ही माहिती तालुक्यात पसरताच पंचक्रोशीतील नागरिकांनी वाघाला पाहण्याकरिता मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आज घटनास्थळाला जत्रेचे स्वरूप आले होते. नागरिकांची गर्दी लक्षात घेता चिमूर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
आदेशाच्या प्रतीक्षेत कनिष्ठ अधिकारी हतबल
बुधवारपासून वाघ जखमी असल्याची माहिती चिमूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना होताच ते पाच दिवसांपासून वाघाची सुरक्षा करीत होते. या पलिकडे त्यांना कुठलेच अधिकार देण्यात आले नाही. वरिष्ठाच्या सूचना व आदेशाशिवाय काही करू शकत नव्हते. एकूणच कनिष्ठ अधिकारी वरिष्ठाच्या आदेशापुढे हतबल झाले होते.
जखमांना लागल्या होत्या अळ्या
वन अधिकारी व वन्यजीवप्रेमीच्या अंदाजानुसार वाघाचे वय नऊ ते दहा वर्षांचे असून त्याची लांबी १८५ सेमी तर वजन १५३ किलो होते. त्याच्या तोडांवरील उजव्या बाजुच्या डोळ्यावर, पायाला व पाठीवरील जखमांमध्ये अळया पडल्या होत्या, असे पाहणीत आढळून आले.

एका ढाण्या वाघाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली. वाघ खरोखरच जखमी असल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यामुळे नागरिकांनीही वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला.

Web Title: Yeda Anna's negligent victim of Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.