चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

By राजेश मडावी | Published: April 24, 2023 06:10 PM2023-04-24T18:10:38+5:302023-04-24T18:11:36+5:30

गारपीटीची शक्यता

Yellow alert for four days in Chandrapur district, administration appeals to citizens to be vigilant | चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

googlenewsNext

चंद्रपूर : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात २४ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्‍ह्यातल एक दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग ४०- ५० कि.मी. तास) आणि गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. २५ ते २८ एप्रिल २०२३ या दिवसांकरीता यलो अलर्ट व २५ एप्रिल २०२३ या कालावधीकरीता ऑंरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा, गहू, मोहरी, जवस इत्यादी.) पिकाची आवश्यक काळजी घ्यावी. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहावे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विजा होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे. शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

Web Title: Yellow alert for four days in Chandrapur district, administration appeals to citizens to be vigilant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.