योग जीवनपद्धती आहे - पाटील
By admin | Published: May 13, 2014 11:25 PM2014-05-13T23:25:10+5:302014-05-13T23:25:10+5:30
योग अभ्यासाचे धडे बालवयातच गिरविले तर, मुलांवर योग्य संस्कार होते. योगाकरिता वेगळा वेळ काढण्याची आवश्यकता नाही, तो मनापासून अंगिकारावा लागतो.
वरोरा : योग अभ्यासाचे धडे बालवयातच गिरविले तर, मुलांवर योग्य संस्कार होते. योगाकरिता वेगळा वेळ काढण्याची आवश्यकता नाही, तो मनापासून अंगिकारावा लागतो. योग ही जीवनपद्धती आहे. असे मत, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, योग व नैसर्गिक उपचार पद्धती विभागाचे प्रमुख डॉ. सुर्यकांत पाटील यांनी व्यक्त केले. लोकमान्य सांस्कृतिक मंडळ व चंद्रपूर जिल्हा योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. लोकमान्य विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील होते. संस्थेचे कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळपाटील व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील प्रा. प्रशांत गुलस्के यांची उपस्थिती होती. प्रा.गुलस्के यांनी मुलांच्या संस्कारावर भर देत पालकांनी मुलांच्या संरक्षणावरही लक्ष द्यावे, असे सांगितले. मुलांवरील लैंगिक अत्याचारामध्ये वाढ झाली असून तो परिचित व्यक्तीकडून अधिक होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे ते म्हणाले. प्रा. श्रीकांत पाटील यांनी योगामुळे शरीराची शुद्धी होते. मनाची शुद्धी आणि चित्त शुद्धी होते. समाजातील वाढत्या सामाजिक व सांस्कृतिक प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी योग अभ्यास आवश्यक आहे. मागील आठ वषार्ंपासून सतत होत असलेल्या या शिबिराचे त्यांनी कौतुक केले. ७ ते १७ वयोगटातील ५५ शिबिरार्थी यात सहभागी झाले. योग पट्टूंनी सुर्यनमस्कार, मधुराष्ट्रक, पांडुरंग स्तोत्र, यासह विविध आसनांचे प्रात्यक्षिक याप्रसंगी केले. योग नृत्य व कला शिक्षकांनी रेखाटलेली रांगोळी वेधक होती. कौस्तुभ रामगुंडावार, मयुरी बांगडे, शुभांगी बोबडे व दानिया शेख यांचा यावेळी उत्कृष्ठ योगपटू म्हणून सत्कार करण्यात आला. प्रा. उत्तम देवूळकर, मकरंद घोटकर, स्मिता धोपटे, सुनील बांगडे, अनिल घुबडे आदींनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. े संचालन शुभांगी नक्षिणे, प्रास्ताविक तुषार अडोणी तर, आभार राहूल राखे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)