योग हे कोविड महामारीतून मुक्त होण्याचे शास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:52+5:302021-06-21T04:19:52+5:30
मनातील चित्तवृत्तीचे नियंत्रण करणे म्हणजेच योग अशी योगाची व्याख्या ‘पतंजली योगदर्शन’ या ग्रंथात केली आहे. दिवसेंदिवस योगाबाबत जनजागृती होत ...
मनातील चित्तवृत्तीचे नियंत्रण करणे म्हणजेच योग अशी योगाची व्याख्या ‘पतंजली योगदर्शन’ या ग्रंथात केली आहे. दिवसेंदिवस योगाबाबत जनजागृती होत आहे. त्यामुळे योगाशास्त्राकडे बरेच जण आकर्षित होत आहेत; परंतु योगशास्त्राच्या खऱ्या स्वरूपाबाबत जनजागृती गरजेची आहे. अन्यथा चुकीच्या पद्धतीने योगाभ्यास झाल्यास अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. परिणामी योगशास्त्राबद्दल गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे योगशास्त्राचे खरे स्वरूप समजावून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. धानोरकर दाम्पत्यांनी केले आहे.
बॉक्स
असा करा योगाभ्यास
रोगप्रतिकारशक्ती अबाधित ठेवण्यासाठी नियमित योगासने, प्राणायाम यांचा अभ्यास व योग्य आहार घेणे गरजेचे आहे. ज्यांना कठीण आसने जमत नाहीत त्यांनी सुरुवातीला पूरक हालचालींचा अभ्यास करावा, नंतर सूर्यनमस्कार व योगासने यांचा अभ्यास करावा. त्यामुळे स्नायूंचा ताठरपणा कमी होऊन लवचिकता वाढण्यास मदत होते. प्राणायामाचा अभ्यास व्यवस्थित केल्यास श्वसनसंस्था मजबूत होते. फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. याची गरज कोविड काळात वाढली आहे. ऋषी-मुनींनी संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. याचे जतन केले पाहिजे व प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योग अंगीकारला पाहिजे, असे आयुर्वेदाचार्य डॉ. धानोरकर दाम्पत्याने सांगितले.