इको-प्रो संस्थेच्यावतीने किल्ला परकोटवर योगदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:50+5:302021-06-22T04:19:50+5:30
चंद्रपूर : जागतिक योग दिनानिमित्त चंद्रपूर किल्ला परकोटवरून योग दिन साजरा करत आपले आरोग्य व शहरातील ऐतिहासिक वारसा ...
चंद्रपूर : जागतिक योग दिनानिमित्त चंद्रपूर किल्ला परकोटवरून योग दिन साजरा करत आपले आरोग्य व शहरातील ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याच्या संदेश इको-प्रो संस्थेच्या वतीने देण्यात आला.
चंद्रपुर शहरातील ११ किमी लांब, ५५० वर्ष प्राचीन गोंडकालीन किल्ला परकोटची स्वच्छता अभियान सलग एक हजार अधिक दिवस निरंतर चालवत स्वच्छता केली. त्यानंतर याच किल्ल्यावरून पर्यटनकरिता हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. सोबत या किल्ल्याचे संरक्षण व्हावे, स्वच्छता कायम राहावी म्हणून योगदिनाचे आयोजन केले जाते. यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, संस्थेचे नितीन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, रवी गुरनुले, संजय सब्बनवार, अब्दुल जावेद, राजू काहीलकर, कुणाल देवगीरकर, सुधीर देव, राजेश व्यास, कपिल चौधरी, प्रमोद मलिक, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, सुमित कोहले, श्रीकांत तीपर्तिवार, प्रीतेश आदी सदस्य सहभागी झाले होते.