उद्योगाअभावी तरुण वळले अवैध व्यवसायाकडे
By admin | Published: January 10, 2016 01:15 AM2016-01-10T01:15:08+5:302016-01-10T01:15:08+5:30
तालुक्यात उद्योग व्यवसाय मोडकळीस आल्याने बेरोजगारांच्या हाताला काम नाही.
अनेकांचे स्थलांतर : हाताला काम मिळत नसल्याने बेरोजगारी वाढली
सिंदेवाही : तालुक्यात उद्योग व्यवसाय मोडकळीस आल्याने बेरोजगारांच्या हाताला काम नाही. यातून अनेकजण अवैध व्यवसायांकडे वळले असून त्यातूनच तालुक्यात दारु, सट्टा, लॉटरी, धंदे फोफावत आहे. काहीजण दारु विकताना दिसत आहे. गावागावांतील तरुणांच्या हाताला कामच नाही. तालुक्यात शेतीशिवाय रोजगाराचे अन्य साधन नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. एमआयडीसीतील उद्योग अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे अनेक हात रिकामे आहेत. शिक्षण घेतलेले तरुण शेतात राबायला तयार नाही. कमी क्षमात अधिक पैसा हवा असतो. अशातून शहराकडे धाव घेतात. मात्र ज्यांना शहरात जाणे जमत नाही अनेक जण अवैध धंदाचा आधार घेतात. अवैध प्रवासी वाहतुकीमध्ये अनेक बेरोजगार गुंतले आहे. अनेकांनी तर शेती विकून वाहने घेतली आहे. अशा शेत मजुरांच्या मुलांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अनेक गावात रिकामे टेकडा वेळ जुगार खेळण्यात, मटका लावण्यात जातो. काहीनी दारुबंदी झाल्यापासून अनेक बेरोजगार दारु विकताना किंवा पुरवठा करताना दिसत आहे. तालुक्यात व्यसना आहारी गेलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तालुक्यात उद्योग उभाराच्या यासाठी कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. तालुक्यात उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. यासाठी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी एमआयडीसीचा परिसर सुसज्ज करण्याची गरज आहे. मात्र एकही लोकप्रतिनिधी यासाठी पुढाकार घेत नाह. (शहर प्रतिनिधी)