घुग्घुसमध्ये नकली बंदुकीचा धाक दाखवून युवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:15+5:302021-08-27T04:31:15+5:30

वेकोलिच्या घुग्घुस गांधीनगर परिसरात रहिवासी सौरभ रमेश गणगोनी हा आयटीआयचा विद्यार्थी असून त्याच्याकडे टाटा वाहन आहे. त्याच्या क्वाॅर्टरजवळच सोनल ...

Young man beaten in Ghughhus for fear of fake guns | घुग्घुसमध्ये नकली बंदुकीचा धाक दाखवून युवकाला मारहाण

घुग्घुसमध्ये नकली बंदुकीचा धाक दाखवून युवकाला मारहाण

Next

वेकोलिच्या घुग्घुस गांधीनगर परिसरात रहिवासी सौरभ रमेश गणगोनी हा आयटीआयचा विद्यार्थी असून त्याच्याकडे टाटा वाहन आहे. त्याच्या क्वाॅर्टरजवळच सोनल राबट राहतो. पाच महिन्यांपूर्वी त्याने टाटा सुमो मागितली. मात्र वाहन दिले नसल्याचा राग मनात ठेवून बुधवारी रात्री ९.३० वाजतादरम्यान सौरभ मित्रासोबत क्वाॅर्टर समोर बसला असता अचानक आरोपी सोनल तिथे आला व तू मला गाडी का दिली नाही म्हणून कॉलर पकडून शिवीगाळ करीत मारहाण केली व जवळ असलेली बंदूक त्याच्यावर तानली. त्याची आई धावून आली असता तिलाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून सोनल राबटविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान ती बंदूक नकली असून तो भीती दाखविण्यासाठी वापरत असल्याचे पोलिसाच्या तपासात निष्पन्न झाले.

Web Title: Young man beaten in Ghughhus for fear of fake guns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.