प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे गेला तरुणाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:49+5:302021-09-02T04:59:49+5:30
नगर परिषद क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करावयाचे असल्यास नगर परिषदेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...
नगर परिषद क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करावयाचे असल्यास नगर परिषदेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नव्याने एकूण १७ गाळ्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामाला नगर परिषदेची प्रशासकीय मंजुरी घेणे आवश्यक होते. मात्र बाजार समितीने परवानगी घेतलेली नाही. मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरून ११ के. व्ही. विद्युत तारा गेल्या आहेत. अशा तारांच्या खाली बांधकाम करण्याची परवानगी देण्यात येत नाही.
सोमवारी बांधकाम सुरू असताना नजरचुकीने जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन मिथुन नीलकंठ भोयर (२७) रा. गोगाव या कामगाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बाजार समिती प्रशासन, नगर परिषद प्रशासन, घटनेनंतर पंचनामा करणारे पोलीस प्रशासन सदर प्रकरणाबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाजार समितीने विद्युत तारा स्थानांतरण करण्याकरिता प्रस्ताव दिलेला आहे. तो मंजूरही करण्यात आलेला आहे. मात्र कंत्राट होणे शिल्लक आहे. तरीदेखील त्यांनी काम सुरू केले.
-एस. ची. रामटेककर, सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी, ब्रह्मपुरी शहर
310821\img-20210831-wa0124.jpg
बाजार समितीत सुरू असलेले गाळे बांधकाम