युवापिढींनी अनिष्ठ प्रथांचा नायनाट करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:47 PM2017-12-01T23:47:08+5:302017-12-01T23:47:31+5:30
अड्याळ टेकडी सूवर्ण महोत्सवाची तिसºया दिवशी दलितमित्र सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाने सांगता झाली. विविध जिल्ह्यातून अनेक गणमान्य व्यक्तींसह हजारो गुरुदेवपे्रमी उपस्थित होते.
संजय अगडे, शरद देवाडे ।
आॅनलाईन लोकमत
अड्याळ टेकडी : अड्याळ टेकडी सूवर्ण महोत्सवाची तिसºया दिवशी दलितमित्र सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाने सांगता झाली. विविध जिल्ह्यातून अनेक गणमान्य व्यक्तींसह हजारो गुरुदेवपे्रमी उपस्थित होते. सकाळी चैतन्य महाराज यांच्या अध्यात्म सत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर महिला व युवा संमेलन घेण्यात आले. यावेळी अनिष्ठ रुढींचे उच्चाटन करण्यासाठी युवापिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संजय नाथे तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाचे डॉ. भाऊ दायदार, माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर व गुरुकुलात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते. या सत्रात गुरुकुलात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांचे मान्यवरांच्या हस्ते विविध भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालक साईराम महाराज, ललीता पोईनकर, गणेश नन्नावरे, सुनंदा काळेवार, पितांबर बिलवणे, भगवान मडावी, सुनील राठोड आदींचा समावेश होता. याच सत्रात डॉ. भाऊ दायदार यांनी राष्ट्रसंतांच्या जीवन व कार्यावर विचार मांडले. अध्यक्षीय भाषण संजय नाथे यांनी केले. यानंतर अड्याळ टेकडी तत्त्वज्ञान या विषयावर कार्यगौरव सत्र पार पडले. विविध पुस्तकांचेही प्रकाशनही पार पडले. या सत्रात अड्याळ टेकडीचे प्रमुख लक्ष्मणदादा नारखेडे, चैतन्य महाराज, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, सत्यपाल महाराज, बंडोपंत बोढेकर, भाऊ थुटे, रामकृष्ण अत्रे महाराज, डॉ. शिवनाथ कुंभारे, प्रा. जगनाडे व प्राचार्य कोकोडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. लक्ष्मणदादा म्हणाले, देशाची परिस्थिती सुधारायची असेल तर ग्रामगीतेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांना ग्रामगीता खरेदी करुन ती वाचायला द्या. यावेळी भाऊ दायदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. बलदेव काकडे, सुबोधदादा तर प्रास्ताविक अनिल गुळधे यांनी केले.
मातीची भांडी देऊन सत्कार
विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना मातीची भांडी देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण कलावंतांना प्रोत्साहन देणे हा मुख्य हेतू होता.
मोहफुलापासून बनविण्यात आलेल्या शिऱ्याचे आकर्षण
समारोपीय कार्यक्रमाच्या दिवशी दिवसभर महाप्रसाद वाटप करण्यात आले. या महाप्रसादात मोहफुलापासून बनविण्यात आलेला शिरा सर्वांच्या आकर्षणाचा मेनू ठरला होता. दिवसभर हजारो नागरिकांना शिऱ्याचे वाटप करून तोंड गोड करण्यात आले.
दादांना आदरांजली
पूर्व विदर्भ आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हजारो गुरुदेव भक्त अड्याळ टेकडींच्या सुवर्ण महोत्सवाकरिता उपस्थित झाले होते. हजारो गुरुदेव भक्तांनी तुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रेरणा स्थळाचे दर्शन घेऊन अंत:करणातून आदरांजली अर्पण केली.