तरुणाईने सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:34 PM2017-10-22T23:34:30+5:302017-10-22T23:34:41+5:30
सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र यातून अनेक गुन्हे घडत आहेत. आधुनिक साधनांचा वापर करताना कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवावे ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र यातून अनेक गुन्हे घडत आहेत. आधुनिक साधनांचा वापर करताना कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवावे आणि सोशल मिडियाच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन पोलीस विभागातील सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे यांनी केले. सर्वोदय शिक्षण मंडळ संचालीत लिना किशोर मामीडवार इंन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये आयोजित सायबर क्राईम या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी सायब सेलचे मुजावर अली उपस्थिती होती. विकास मुंडे यांनी दुसºयाचे बनावट प्रोफाईल तयार करणे गुन्हा आहे. फेसबुक व व्हॉट्स अॅप या माध्यमांचा वापर करताना काळजी घ्या, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. मुंडे म्हणाले, धार्मिक भावना दुखावणाºया पोस्ट कुणीही टाकू नये. एटीएम व क्रेडीट कार्ड वापरताना त्याचे क्लोनिंग होत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. चेंजिग रुममध्ये अथवा बाहेर गावी हॉटेलमध्ये मुक्कामाचे ठिकाणी छुमा कॅमेरा असून शकतो अशावेळी अगोदर आपले स्मार्ट फोनमधील लाल लाईट लागत असल्याचे आढळल्यास तक्रार करा, असेही यावेळी नमूद केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. एन. चक्रवर्ती यांनी केले. संचालन प्रा. डॉ. फारुख शेख यांनी केले. कार्यशाळेला एमबीए बीबीए व डीआयआरपीएम अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.