अग्निशस्त्र बाळगणारा तरुण एलसीबीच्या जाळ्यात; तीन दिवसातील दुसरी कारवाई
By परिमल डोहणे | Published: September 22, 2023 08:36 PM2023-09-22T20:36:21+5:302023-09-22T20:37:06+5:30
तीन दिवसातील दुसरी कारवाई आहे. या कारवाईने अवैध शस्त्र बाळगणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
चंद्रपूर : आपल्या घरी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. अमर रमेश आत्राम (19) रा. कोहपरा ता राजुरा जि. चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तीन दिवसातील दुसरी कारवाई आहे. या कारवाईने अवैध शस्त्र बाळगणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
गणेश उत्सवाच्या दरम्यान समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी भयमुक्त गणेश उत्सव या संकल्पनेतून पोलिस अधीक्षकांनी अवैधरीत्या शस्त्र व अग्गीशस्त्र बाळगनारे गुन्हेगाराविरुध्द विशेष मोहीम राबवीन्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले होते. दरम्यान शुक्रवारी अमर रमेश आत्राम हा हा आपल्या घरी अवैधरीत्या अग्गीशस्त्र बाळगुन आहे. यावरून अमर आत्राम याला ताब्यात घेवुन त्याच्याकडुन एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र व मोबाईल असा एकुण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून
पोलिस स्टे विरुर येथे कलम 3 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
यापुर्वी 18 सप्टेंबर रोजी राजुरा येथे राजरतन राहुल बनकर याच्याकडून एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र व 1 जिवंत काळतुस जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पो. नि. महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक अतुल विनायक कावळे, पोना अनुप डागे, जमिर पठाण, नितेश महात्में, मिलींद चव्हान, प्रसाद धुळगंडे, दिनेश अराडे आदींनी केली.