युवक काँग्रेसचे ‘निषेधासन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:49 PM2018-10-31T22:49:36+5:302018-10-31T22:49:51+5:30
राज्यातील भाजप सरकारने विकासाचे अनेक आश्वासने दिली. सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. मात्र विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करण पुगलिया, एनएसयूआयचे अध्यक्ष स्वप्नील तिवारी त्यांच्या नेतृत्वात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बुधवारी अहिंसात्मक ‘निषेधासन’ आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील भाजप सरकारने विकासाचे अनेक आश्वासने दिली. सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. मात्र विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करण पुगलिया, एनएसयूआयचे अध्यक्ष स्वप्नील तिवारी त्यांच्या नेतृत्वात गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बुधवारी अहिंसात्मक ‘निषेधासन’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या हातात सरकारचे विडंबन करणारे फलक होते. अभ्यासन, घोषणासन किंवा गाजरासन, क्लीन चिटासन, वाचाळसन, महागाई आसन, बेरोजगारासन, भक्तासन, टोलासन, फसवणीआसन, धमकी आसन, अंशतासन, रॉफेलासन, मौनासन, असे लिहिलेले विडंबनात्मक फलक लोकांचे लक्ष वेधून घेत होते. फलकावरील प्रत्येक आसनाची माहिती उदाहरणासहित लोकांना सांगितल्या जात होते. भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होऊनही विकासकामे कागदावरच असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे करण पुगलिया नगरसेवक अशोक नागपूरे, देवेंद्र बेले, प्रवीण पडवेकर, दुर्गेश चौबे, स्वप्नील तिवारी, स्नेहल चालूरकर, चेतन गेडाम, प्रतीक हरणे, जुनेद शफीक व शहरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जटपुरा गेटसमोर आंदोलन
चंद्रपूर : युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष शिवा राव यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिश कोत्तावार यांच्या नेतृत्वात बुधवारी जटपुरा गेटसमोर आंदोलन करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मुलगी व जावयांच्या बँक खात्यामध्ये मेहुल चोक्शी याच्याकडून २४ लाख रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे केंद्रीय मंत्री जेटली यांनी राजीनामा देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प आहेत. बेरोजगारांना रोजगार नाही. राज्यातील अनेक उद्योग बंद झाले, असा आरोप यावेळी करण्यात आला. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन कत्याल, रुचित दवे, विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, ईमरान खान, सुमेध चंदनखेडे, वाहिद शेख, भानेश जंगम, सुरज कन्नुर, अरविंद मडावी उपस्थित होते.