आंघोळीला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:14 PM2018-03-03T23:14:54+5:302018-03-03T23:16:16+5:30
धुळवडीच्या रंगात न्हावून निघालेल्या सवंगड्यासोबत वैनगंगेच्या जुनगाव - बोरीघाट येथे आंघोळीला गेलेल्या युवकाचा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११. ४० वाजता घडली.
आॅनलाईन लोकमत
घोसरी : धुळवडीच्या रंगात न्हावून निघालेल्या सवंगड्यासोबत वैनगंगेच्या जुनगाव - बोरीघाट येथे आंघोळीला गेलेल्या युवकाचा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११. ४० वाजता घडली.
लोकेश सुनील निमसरकार (२२) रा. घोसरी असे मृत युवकाचे नाव आहे. ऐन रंगपंचमीला घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली. पोंभुर्णा तालुक्यातील मौजा घोसरी येथील पंचशील नगरातील लोकेश व त्याचे मित्र यांनी मनसोक्तपणे रंगाची उधळण केल्यानंतर ते आंघोळीसाठी वैनगंगा नदीवर गेले होते.
दरम्यान, लोकेशला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडायला लागला. मात्र बाहेर निघणे शक्य न झाल्याने यात त्याचा बुडून मृत्यू झाला. यावेळी इतर मित्रांसोबत लोकेशचा भाऊ विकेश निमसरकार हा सुध्दा होता.
विशेष म्हणजे, ६ मार्च २००६ रोजी रंगपंचमीला याच वैनगंगेच्या मुधोली घाटावर नाव उलटून ११ जणांना जलसमाधी मिळाली होती. शुक्रवारी रंगपंचमीला अशी घटना घडल्यामुळे घोसरीत शोककळा पसरली.