ई-पीक पाहणी प्रकल्पात मिशन मॅथेमॅटिक्सचे युवक सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:34 AM2021-09-16T04:34:26+5:302021-09-16T04:34:26+5:30
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी सजांतर्गत ७ गावांचे व्याप्त क्षेत्र असताना नुकताच पिपरी देशपांडे सजाचे कार्यरत तलाठी यांचे स्थानांतरण झाले असल्याने ...
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी सजांतर्गत ७ गावांचे व्याप्त क्षेत्र असताना नुकताच पिपरी देशपांडे सजाचे कार्यरत तलाठी यांचे स्थानांतरण झाले असल्याने सजातील ८ गावांचा प्रभार घोसरीचे तलाठी मोरे यांच्याकडे दिला आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राबविण्यात येत असून, टाटा ट्रस्टच्या साहाय्याने ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकरी ॲपद्वारे आपल्या शेतातील पिकांची नोंद सातबारावर स्वतःच करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
ई-पीक पाहणी महसूल विभागाच्या सजातील तलाठी पिकांची नोंदी तपासून घेणार आहेत. ही पाहणी मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे घोसरी तलाठ्याच्या मदतीला मिशन मॅथेमॅटिक्सचे अक्षय वाकूडकर यांच्या सहकार्याने पीक पाहणी सर्वेक्षणास प्रत्यक्ष शेतात भेटी देत असल्याने सजाच्या ई-पीक पाहणीत पोंभुर्णा तालुक्यात आघाडी घेत आहे.
150921\img-20210911-wa0134.jpg
ई-पिक पाहणी प्रकल्पाच्या कामात तलाठ्याच्या मदतीला 'मिशन मँथमेटीक्स'चे युवक सरसावले