समृद्ध भारतासाठी युवकांनी पुढे यावे - अम्ब्रीशराव
By admin | Published: January 12, 2015 10:47 PM2015-01-12T22:47:55+5:302015-01-12T22:47:55+5:30
भारतीय युवकांचा सर्वांगीन विकास हेच माझे ध्येय असून समृद्ध भारताच्या विकासासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी
राजुरा : भारतीय युवकांचा सर्वांगीन विकास हेच माझे ध्येय असून समृद्ध भारताच्या विकासासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी येथे केले. स्वामी विवेकानंद जयंती व भाजपा सदस्य नोंदणी शुभारंभाप्रसंगी स्थानिक यादवराव धोटे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपा जिल्हा सचिव अरुण मस्की, मधुकर नरड, आदिवासी नेते वाघु गेडाम, सुधीर धोटे, भाजापचे राजुरा तालुका अध्यक्ष डॉ. लखन अडबाले, सतीश धोटे, महिला आघाडी सदस्य मानिक उपलंचीवार, सचिन डोहे, सुनील उरकुडे, किशोर बावणे, वामन तुरानकर, राजुरा शहर अध्यक्ष बादल बेले, सुरेश रागीट, राजु घरोटे, किशोर बावणे, भाऊराव चंदनखेडे उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सचिन भेंडे, शेतकरी संघटनेचे दिलीप वांढरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. प्रास्ताविक भाजपा राजुरा विधानसभा क्षेत्र प्रमुख खुशाल बोंडे यांनी केले. संचालन बंडू बोढे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार अमित जयपूरकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)