युवकांनी समाजहिताच्या दृष्टीने कार्य करावे

By admin | Published: October 11, 2016 12:54 AM2016-10-11T00:54:24+5:302016-10-11T00:54:24+5:30

आजचा युवक हा भविष्य काळात देशाचे नेतृत्व करणार असल्याने त्यांच्या अंगी विविध कलागुणांसोबत संस्कार देखील महत्त्वाचे आहेत.

The youth should work in the social sector | युवकांनी समाजहिताच्या दृष्टीने कार्य करावे

युवकांनी समाजहिताच्या दृष्टीने कार्य करावे

Next

संजय मारकवार : मूल येथे युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम 
मूल : आजचा युवक हा भविष्य काळात देशाचे नेतृत्व करणार असल्याने त्यांच्या अंगी विविध कलागुणांसोबत संस्कार देखील महत्त्वाचे आहेत. विविध स्पर्धा परिक्षेतून त्यांनी स्वत:ला कणखर बनविले पाहिजे. तोच युवक देशाचा आधारस्तंभ ठरणार असल्याने युवकांनी समाजहिताच्य दृष्टीने कार्य करावे, असे मत पंचायत समिती मूलचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पाटील मारकवार यांनी केले.
मूल येथे आयोजित युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. क्रीडा व युवक सेवा संचालनाय पुणे व संस्कार फाऊंडेशन मूलच्या वतीने युवा नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. चंद्रकांत मनियार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उपन्न बाजार समितीचे संचालक शांताराम कामडे, हसन वाढई, तालुका पत्रकार संघाचे संजय पडोळे, पत्रकार दीपक देशपांडे, गंगाधर कुनघाडकर, अशोक येरमे, अल्का राजमलवार, संस्कार फाऊंडेशन मूलचे अध्यक्ष राजू गेडाम आदी उपस्थित होते.
यावेळी देश विकासाला युवकाचे योगदान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व भावगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच ‘एड्स’ या विषयावर प्रा. चंद्रकांत मनियार व युवा नेतृत्व या विषयावर दीपक देशपांडे यांनी मार्गदशन केले. विजेत्या स्पर्धकांना नगर परिषद आरोग्य सभापती प्रशांत समर्थ यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आली. परिक्षणाचे काम अशोक येरमे व अल्काताई संगमवार यांनी केले. संचालन बंडु अल्लीवार व उपस्थितांचे आभार आशिष मालोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बोर्डावार, प्रशांत मेश्राम, शिवम गेडाम आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The youth should work in the social sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.