ब्रह्मपुरीतील समस्यांबाबत युवकांचे निवेदन
By admin | Published: June 4, 2016 12:49 AM2016-06-04T00:49:59+5:302016-06-04T00:49:59+5:30
शहरातील वर्षानुवर्ष रखडलेल्या समस्या आजही अडचणीच्या व धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून समस्येवर तोडगा काढावा म्हणून,
ब्रह्मपुरी : शहरातील वर्षानुवर्ष रखडलेल्या समस्या आजही अडचणीच्या व धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून समस्येवर तोडगा काढावा म्हणून, येथील युवकांनी नुकतेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
ब्रह्मपुरी शहराची ओळख सर्वदूर आहे. त्या मानाने समस्यांची उकल होणे गरजेचे आहे. मात्र नगरपरिषद अस्तीत्वात आली, तेव्हापासून समस्या जटील व गुंतागुंतीच्या होत गेल्या असे सुजान नागरिकांचे म्हणणे आहे. त्याच त्याच समस्यांना रोजच तोंड देवून सामोरे जावे लागत असल्याने ब्रह्मपुरीतील युवकांनी पुढाकार घेवून मुख्याधिकाऱ्यां मार्फत अभियंता बंडावार यांना निवेदन देवून समस्या सोडविण्याची मागणी केली.
समस्यांमध्ये बाजार चौक ते ख्रिस्तानंद चौक रोडवरील अतिक्रमण हटविणे, नळाला लावण्यात येणाऱ्या टिल्लू पंपधारकांवर कार्यवाही करणे, रस्त्यावर अवैध पार्किंग हटविणे ई. प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश आहे. या तीन प्रमुख मागण्यासंदर्भात अभियंता बंडावार यांच्याशी युवकांनी चर्चा घडवून आणली असता, चर्चेदरम्यान या मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी विवेक कळंबेकर, दिलीप पंडित, गिरीश बुराडे, मोहन राजणकर, शशांक नानोटी, राजू देऊरकर, मनीष नाकतोडे, आल्हाद शिनखेडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)