युवा दिनी प्रभातफेरीने चंद्रपूर दुमदुमले
By admin | Published: January 17, 2017 12:32 AM2017-01-17T00:32:43+5:302017-01-17T00:32:43+5:30
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्य आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, ...
स्वामी विवेकानंद जयंती : आरोग्य विभागातर्फे आयोजन
चंद्रपूर : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्य आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय चंद्रपूरच्या वतीने सोमवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीत चंद्रपूर शहरातील महाविद्यालय, पॅरामेडीकल महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था व प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दुधे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यू.व्ही. मुनघाटे, रोटरी क्लब आॅफ चंद्रपूरचे अध्यक्ष अशोक हसानी आणि रोडमल गहलोत, रोट्रॅक क्लब आॅफ चंद्रपूरचे अध्यक्ष आरती गोस्वामी, इनरव्हील क्लब आॅफ चंद्रपूर अंजुम कुरेशी व सीमा अग्रवाल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमन पनगंटीवार, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंग्रुळकर आणि जिल्हा सहायक मूल्यमापन व सहनियंत्रण सारंग, आगरकर, आय.सी.टी.सी. कर्मचारी शारदा लोखंडे, राकेश दुर्योधन, साहेबराव हिवरकर, शालिनी धांडे, वैशाली गेडाम व सुरक्षा क्लिनकच्या राखी देशमुख आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
१२ ते २६ जानेवारी या काळात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या अंतर्गत ही रॅली काढण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यू.व्ही. मुनघाटे यांनी प्रभात फेरीत उपस्थितांना शपथ दिली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते झेंडी दाखवून प्रभात फेरीस सुरूवात करण्यात आली. एच.आय.व्ही.चा प्रतिबंध आणि युवकांनो जागे व्हा, एच.आय.व्ही.ला देशातून हद्पार करा आदी घोषणा देत मुख्य मार्गाने मार्गक्रम करीत परत सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे समारोप करण्यात आली.
प्रभातफेरीत रोटरी क्लब आॅफ चंद्रपूर, रोट्रॅक क्लब आॅफ चंद्रपूर, इन्नरव्हील क्लब आॅफ चंद्रपूर, इनरव्हील क्लब आॅफ चांदा फोर्ट, नोबेल ट्रकर्स, विहान काळजी व आधार केंद्र क्रइस्ट हॉस्पिटल, संबोधन ट्रस्ट आणि शिवार संस्था तसेच कॉलेज आॅफ नर्सिंग, राणी हिराई नर्सिंग स्कूल, प्रभादेवी स्कूल आॅफ नर्सिंग, एस.आर.एम. कॉलेज आॅफ सोशल वर्क पडोलीचे अध्यक्ष आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)