महिलांच्या आत्मसन्मानासाठी ‘उमेद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:36 PM2018-11-30T23:36:47+5:302018-11-30T23:37:00+5:30
बचत गटांच्या चळवळींंना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोत्ती अभियान अर्थात ‘उमेद’ची स्थापना झाली. या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी व गरिबी निर्मूलनासाठी, तसेच समुदाय विकासापासून शास्वस्त उपजिविका निर्माण करण्यासाठी ‘वर्धिनी’ ची धावपळ खरंच प्रेरणादायी असल्याचे जिवंत उदाहरण नागभीड तालुक्यातील सोनापूर (तुकूम) या गावी प्रत्यक्षात पाहायला मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी : बचत गटांच्या चळवळींंना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोत्ती अभियान अर्थात ‘उमेद’ची स्थापना झाली. या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी व गरिबी निर्मूलनासाठी, तसेच समुदाय विकासापासून शास्वस्त उपजिविका निर्माण करण्यासाठी ‘वर्धिनी’ ची धावपळ खरंच प्रेरणादायी असल्याचे जिवंत उदाहरण नागभीड तालुक्यातील सोनापूर (तुकूम) या गावी प्रत्यक्षात पाहायला मिळाले.
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष नागभीड यांनी या अभियानांमार्फत गावात महिला वर्धिनी यांना पाठविले व गेल्या १५ दिवसात गावातील सर्व महिलांना एकत्रित करून अभियानात समाविष्ट केले. स्वयंसाहाय्यता समुहात स्थापना करून येथील महिलांना जीवन जगायची नवी उमेद निर्माण केली. याच अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम, कौशल्यवृध्दी, क्षमताबांधणी, बँक व्यवसाय आदी कार्य गावात करण्यात आले. यावेळी समारोपीय कार्यक्रम झाला. याप्रसंगी जि. प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, सरपंच मेश्राम, प्राजक्ता बावनथडे, प्रिया गुरू आदी उपस्थित होते.