जिल्हा परिषद चांदापूर शाळेत महिला शिक्षिका दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:58+5:302021-01-04T04:23:58+5:30
मूल : आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मूल तालुक्यातील चांदापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत महिला ...
मूल : आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मूल तालुक्यातील चांदापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत महिला शिक्षिका दिन म्हणून साजरा करण्यात आली.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता चल्लावार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापिका सुनिता चल्लावार म्हणाल्या, सावित्रीबाई यांच्यामुळे महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी झाली. त्यामुळेच आज महिला या सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे विचार अंगिकारावे, असे आवाहन त्यांनी केले. तर विषय शिक्षक जेंगठे, निमगडे व विषय शिक्षिका रोकमवार यांनी सावित्रीबाई यांचा जीवनपट उलगडला. यावेळी विषय शिक्षक डोंगरवार, बारसागडे, विषय शिक्षिका रोकमवार, हायगुणे, सूर्यवंशी, चिचोंलकर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी अभिवादन केले.
--------
संबुद्ध पंचशिल मंडळ, गोवरी
गोवरी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती कार्यक्रम संबुद्ध पंचशिल मंडळ, गोवरीच्या वतीने तक्षशिला बुद्ध विहार, गोवरी येथे पार पडला. मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिनेश घागरगुंडे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश कास्वते, सुमेश कोल्हे, बुद्धर्ष कास्वते, नयन चुनारकर, सिद्धार्थ कास्वते, सौरभ करमणकर, मयुर कास्वते, नाना कास्वते, लोभेष करमणकर, अमोल डंभारे, संकेत घागरगुंडे, अनमोल घागरगुंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.