जिल्हा परिषदेचे अधिकारी देणार ३६ शाळांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:36 AM2019-06-19T00:36:51+5:302019-06-19T00:37:21+5:30

जिल्हा परिषद शाळांची नवीन सत्रातील पहिली घंटा येत्या २६ जूनला वाजणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली. यंदा प्रथमच संवर्ग-१ चे तब्बल ३६ अधिकारी जिल्ह्यातील ३६ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार आहेत.

Zilla Parishad officials will give gifts to 36 schools | जिल्हा परिषदेचे अधिकारी देणार ३६ शाळांना भेटी

जिल्हा परिषदेचे अधिकारी देणार ३६ शाळांना भेटी

Next
ठळक मुद्देशाळा प्रवेशोत्सवाचा नवीन प्रयोग : दुर्गम, आदिवासी भागातील शाळा वगळल्या

राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांची नवीन सत्रातील पहिली घंटा येत्या २६ जूनला वाजणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली. यंदा प्रथमच संवर्ग-१ चे तब्बल ३६ अधिकारी जिल्ह्यातील ३६ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार आहेत. मात्र, दुर्गम व आदिवासी भागातील बहुतांश शाळांना वगळण्यात आले आहे.
मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा २००९ लागू झाल्यानंतर प्राथमिक शिक्षणातील गुणात्मक विकासासाठी नाविण्यपूर्ण संकल्पांचा जणू रतिब ओतल्या जात आहे. यातून अध्ययन व अध्यापन प्रक्रियेवर काय परिणाम होत आहे, हा स्वतंत्र मूल्यमापनाचा विषय आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत काही शिक्षक संघटनांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत असतात. शैक्षणिक आस्थेपोटी शासनाकडे विधायक सूचना केल्या जात असतील तर नाक मुरडण्याचे काही कारण नाही. परंत, काही शिक्षक नाविण्यपूर्ण उपक्रमातून अंग काढून घेण्यासाठी शिक्षक संघटनांचा ढाल म्हणून वापर करतात, असा पालकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदने २०१९-२० या नवीन शैक्षणिक सत्रासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विशेष लक्ष देण्याचा संकल्प केला. हे ‘३६ अधिकारी ३६ शाळांना देणार भेटी’ या उपक्रमातून दिसून येत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जुन्या परंपरेला फाटा
यापूर्वी पंचायत समिती अथवा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उरकून घेतल्या जात होता. जि. प. ने नवीन शैक्षणिक सत्रात या परंपरेला फाटा दिला. कोणते अधिकारी कोणत्या शाळांना भेटी देणार अशा ३६ अधिकाऱ्यांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले यांनी तयार केली आहे. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, कार्यकारी अभियंता, समाजकल्याण अधिकाऱ्यांसह वर्ग-१ आणि २ संवर्गातील ३६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मुख्याध्यापक देणार १३ प्रकारची माहिती
शाळेच्या पहिल्या दिवशी अधिकाºयांनी भेट दिल्यानंतर मुख्याध्यापकांना शाळा प्रवेशोत्सव भेट प्रपत्रात १३ प्रकारची माहिती द्यावी लागणार आहे. गृहभेटी झाल्या काय, नियोजनाची एसएमसी सभा, गणवेश व पाठपुस्तके विद्यार्थ्यांना दिले काय, वृक्षारोपणाच्या निर्धारित खड्डयांची संख्या किती, आदी माहितीची नोंद करतील.

भेटीसाठी निवडलेल्या जिल्ह्यातील ३६ शाळा
जि. प. उच्च प्राथमिक शाळा वायगाव, मारडा (मोठा), सिनाडा, ढोरवासा, मांगली, आमडी, नांदगाव पोडे, मालडोंगरी, ब्रह्मपुरी क्रं. ४, मारडा, आनंदवन, लिखितवाडा, भंगाराम तळोधी, धानोरा, पंचाळा, दिघोरी, घाटकुळ, मूल, ताडाळा, मुंळाडा, नलसेनी पेठगाव, व्याहाड खुर्द, सरडपार, मेंढामाल, सिंदेवाही नं. २, चिखलपरसोडी, मेंढामाल, मानली, आंबेनेरी, बोथली, उपरवाही, वनसळी, पिंपळगाव, पालडोह, शेणगाव, खिचल (बू.) आदी गावातील शाळांना संबंधित अधिकारी भेटी देणार आहेत.

Web Title: Zilla Parishad officials will give gifts to 36 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.