जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदलीप्रकरणे वादळी ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 05:00 AM2021-07-25T05:00:00+5:302021-07-25T05:00:42+5:30
सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ आगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्रपूर जि. प. अंतर्गत सर्वच विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश धडकल्यानंतर रविवारपासून समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, गतवर्षी शिक्षण विभागातील बीईओची बदली होऊनही शिक्षणाधिकाºयांनी भारमुक्त केले नाही. हे अधिकारी पूर्वीच ठिकाणी कार्यरत असून त्यांची सेवाज्येष्ठता चक्क शुन्य दाखविण्यात आली. परिणामी, कर्मचाऱ्यांची बदलीप्रकरणे समुपदेशाऐवजी वादळी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ आगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. चंद्रपूर जि. प. अंतर्गत सर्वच विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल. गतवर्षी बदली झालेल्या शिक्षण विस्तार एक वर्षे पूर्ण होऊनही शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी भारमुक्त केले नाही. हे अधिकारी पूर्वीच्याच ठिकाणी कार्यरत आहेत. जि. प. ने २१ जुलै २०२१ रोजी बदली पात्र शिक्षण विस्तार अधिकारी व अन्य पदांची यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये चार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता शुन्य दाखविण्यात आली.
गतवर्षी बदली झाल्यानंतरही या अधिकाऱ्यांना भारमुक्त केले नाही. परिणामी, ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत तिथे नवीन बदलीपात्र शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना संधी दिले जात असेल तर या बदल्यांना काय अर्थ, असा प्रश्न शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
बदलीपात्र कर्मचाऱ्यांची उसळणार गर्दी
जि. प. च्या सर्वच विभागातील वर्ग-३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया रविवारपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया दुपारी ४. ४५ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत चालेल. नक्षलग्रस्त भागातील कर्मचारी व बिगर नक्षलग्रस्त क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत तसेच सुट घेणारे सर्वच कर्मचारी आवश्यक प्रमाणपत्रांसह दाखल होणार आहेत. त्यामुळे गर्दी उसळणार आहे.
२० टक्के बदल्यांना मान्यता
- सामान्य प्रशासन व ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार २० टक्के बदल्यांना मान्यता मिळाली आहे. यापूर्वी दोन आदेश धडकल्याने त्यामुळे नेमक्या किती टक्के बदल्या होणार, याबाबत कर्मचारी व संघटनांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. नव्या आदेशामुळे हा संभ्रम दूर झाला आहे.