जिल्हा परिषदेच्या १५ शाळा होणार मॉडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 05:00 AM2020-10-28T05:00:00+5:302020-10-28T05:00:21+5:30
राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाचा समावेश राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडलेल्या शाळांची यादी अंतिम करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. आदर्श शाळांची यादी निश्चत झाल्यानंतर सर्व शासकीय, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रिकरण करून सदर शाळांना विकसित करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शालेय शिक्षण विभागाने राज्यभरातील ३०० जिल्हा परिषद शाळांची निवड केली आहे. या शाळा आता आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून एका शाळेची यासाठी निवड करण्यात आली. यानुसार जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील एक प्रमाणे शाळांची निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाचा समावेश राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडलेल्या शाळांची यादी अंतिम करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. आदर्श शाळांची यादी निश्चत झाल्यानंतर सर्व शासकीय, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय योजनांचे एकत्रिकरण करून सदर शाळांना विकसित करण्यात येणार आहे.
आदर्श शाळा निमिर्तीमध्ये तीन महत्त्वाचे भाग राहणार असून यामध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय बाबींचा समावेश राहणार आहे. दरम्यान, आठवड्यातून किमान एक दिवस दप्तराच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांना मुक्तता मिळणार आहे.
अशा राहणार सुविधा
निवड झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण व क्रीडा साहित्य, आयटीसी लॅब, सायन्स लॅब व ग्रंथालयासारख्या सुविधांचा समावेश राहणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये भौतिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय या सर्वांचा विचार केला जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थांना घडविण्यात येणार आहे.