बेकायदा खर्रा दुकानांवर जिल्हा प्रशासनाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:30 PM2018-01-30T23:30:40+5:302018-01-30T23:31:12+5:30

जिल्ह्यात तंबाखू सेवनातून होणाऱ्या दुर्धर आजाराची संख्या मोठ्या प्रमाणात असून चंद्रपूरला या व्यसनातून मुक्त करण्यासाठी धडक कारवाई करा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी दिले आहे.

Zilla Parishad's Katharpa | बेकायदा खर्रा दुकानांवर जिल्हा प्रशासनाची वक्रदृष्टी

बेकायदा खर्रा दुकानांवर जिल्हा प्रशासनाची वक्रदृष्टी

Next
ठळक मुद्देअप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : अन्न व औषध प्रशासनाने सक्रिय व्हावे

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यात तंबाखू सेवनातून होणाऱ्या दुर्धर आजाराची संख्या मोठ्या प्रमाणात असून चंद्रपूरला या व्यसनातून मुक्त करण्यासाठी धडक कारवाई करा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी दिले आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील समन्वय समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. तंबाखूपासून होणाºया कॅन्सरसारख्या आजाराची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. यामध्ये खऱ्यामध्ये टाकण्यात येणारा सुगंधीत तंबाखूपासून मोठे नुकसान होत आहे.
जिल्ह्यामध्ये मौखिक आरोग्य तपासणीमध्ये एकूण लोकसंख्येच्या शेकडो नागरिकांना तंबाखू सेवनातून मौखिक आजार असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यामध्ये खर्रा सेवनामुळे मोठ्या प्रमाणात कॅन्सर आजारात वाढ होत असल्याचेही पुढे आले असून जवळपास ३६ टक्के लोकांना तंबाखूचे व्यसन जडले आहे, अशी माहिती बैठकीत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नगराळे यांनी दिली. बंदी घालण्यात आलेल्या सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने या विभागाने धडक कारवाई करावी, शहरातील मोक्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्रा व प्रतिबंधित तंबाखू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात कडक कारवाई करावी, असे कडक निर्देश अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाला देण्यात आले. जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी येत्या काळात व्यापक प्रसिध्दी-प्रचार मोहीम राबविण्यात यावी. तसेच अवैधरित्या घातक खर्रा तयार करणाºया पानटपरीधारकांवर कारवाईची तिव्रता वाढवावी, असेही ते म्हणाले.
भरारी पथक गठित करण्याच्या कडक सूचना
शाळांच्या परिसरातील दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी असून कायद्यांर्तंगत कारवाईचे अधिकार पोलीस व अन्न व औषध प्रशासनाला आहे. संबंधीत मुख्याध्यापकांनी याबाबत अन्न व औषधी विभागाकडे तक्रारी कराव्यात. यासाठी भरारी पथक तयार करण्याचे निर्देशही बैठकीत दिले.

Web Title: Zilla Parishad's Katharpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.