१५ मिनिटात गुंडाळली जिल्हा परिषदेची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:08 AM2017-09-29T00:08:27+5:302017-09-29T00:08:40+5:30

शेतीविषयक समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध साहित्य खरेदी व वाटपावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

Zilla Parishad's meeting was rolled out in 15 minutes | १५ मिनिटात गुंडाळली जिल्हा परिषदेची सभा

१५ मिनिटात गुंडाळली जिल्हा परिषदेची सभा

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी उपेक्षित : पदाधिकारी मात्र सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतीविषयक समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध साहित्य खरेदी व वाटपावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. मात्र ही सभा केवळ १५ मिनिटात गुंडाळण्यात आल्याने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शेतकºयांच्या बाबतीत किती सजग आहेत, हे दिसून येते.
शेतकºयांना येणाºया अडचणी दूर करण्यासाठी शेतीविषयक समस्यांचा आढावा घेवून शेतकºयांना विविध साहित्याचा पुरवठा करणे, आवश्यक साहित्याची खरेदी करणे, औषध साठा उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर, डॉ. आसावरी देवतळे, कांबळे या सदस्यांनी पत्र देवून कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरूवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेला अनेक सदस्य अनुपस्थित असल्याने केवळ १५ मिनिटातच ही सभा गुंडाळण्यात आली.
सध्या वातावरणाच्या बदलामुळे सोयाबीन, कापूस, धान पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर पाळीव जनावरांनाही विविध रोगाची लागण होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभेत यावर चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र विशेष सभेत कोणतीही चर्चा न करताना १५ मिनिटात सभा गुंडाळण्यात आल्याने शेतकºयांची घोर निराशा झाली आहे.

Web Title: Zilla Parishad's meeting was rolled out in 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.