जिल्हा परिषदेची वृक्षदिंडी
By admin | Published: June 29, 2017 01:34 AM2017-06-29T01:34:12+5:302017-06-29T01:34:12+5:30
जिल्ह्यातील गावा-गावात अधिकाधिक वृक्षलागवड करण्यात यावी, त्यांचे पूर्णत: संगोपन व्हावे, यासाठी
चार ठिकाणी सभा : वृक्षारोपणाबाबत जनजागर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील गावा-गावात अधिकाधिक वृक्षलागवड करण्यात यावी, त्यांचे पूर्णत: संगोपन व्हावे, यासाठी जिल्हापरिषद चंद्रपूरअंतर्गत वृक्षदिंडीला सुरुवात करण्यात आली. वृक्षदिंडीचा प्रारंभ मंगळवारी जिल्हा परिषदेमधून करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते वृक्षदिंडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
शालेय लेझिम पथकासह जि.प.चे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यासह जेटपुरा गेट येथे जावून अध्यक्ष भोगंळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन करुन वृक्षदिंडी पुढीाल प्रवासाकरिता मार्गस्त झाली. वृक्षदिंडीचे चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली या गावात स्वागत झाले. यानंतर यागावात वृक्षदिंडीद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय पुस्तके भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, अर्थ व बांधकाम सभापती संतोष तगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, जिल्हा परिषदचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. वृक्षदिंडी चार दिवस जिल्ह्याभर गावा-गावात भ्रमण करुन वृक्षरोपण व संगोपणाविषयी जनजागरण करणार आहे. या वृक्षदिंडी द्वारा गावा- गावात सभा, बैठका, घेवून ग्रामस्थांना वृक्षलागवड करण्याची विंनती करणार आहे. वृक्षदिंडी शुभारंभ प्रसंगी प्रास्ताविक व आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी मानले. यावेळी जि.प.चे सर्व अधिकारी,कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावली, मूल, सिंदेवाही, येथे बैठक पार पडली. यावेळी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले.