जि.प. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे आंदोेलन

By Admin | Published: July 12, 2014 11:35 PM2014-07-12T23:35:58+5:302014-07-12T23:35:58+5:30

जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने स्वत: मान्य करून सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास विभाग यांनी कारवाई करण्याबाबतचा अद्यापही आदेश निर्गमित केला नाही.

Zip Health Service Employees Andolan | जि.प. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे आंदोेलन

जि.प. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे आंदोेलन

googlenewsNext

चंद्रपूर : जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने स्वत: मान्य करून सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास विभाग यांनी कारवाई करण्याबाबतचा अद्यापही आदेश निर्गमित केला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील सर्व संवर्गनिहाय संघटनांनी १४ जुलैपासून संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात राज्य कार्यकारिणी द्वारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, आरोेग्य मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव जे.एस. सहारिया यांना पुर्वसूचना देण्यात आली आहे.
या अनुषंंगाने म.रा.जि.प. आरोग्य सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गौरकार यांचे अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथे तातडीची सभा घेण्यात आली. सभेत सुजीत घोटकर, अनिल समर्थ, बबन गायकवाड, कुंदा शेडमाके, आशा सास्तीकर, सिंधू बन्सोड, मधुकर टेकाम, धर्मपाल कऱ्हाडे, पी.एन. कांबळे, कवी जाधव, विमल मडावी, एस.एस. गोवर्धन, एम.एस. नन्नावरे यांच्यासह ३५ प्रतिनिधी उपस्थित होते.
सभेत डॉ. खानदे समितीच्या अहवालानुसार कारवाई करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनतृट्या दूर करणे, महाराष्ट्र विकास श्रेणीत पदोन्नती देण्याकरीता आरोग्य पर्यवेक्षकांच्या ज्येष्ठता याद्या तयार करणे, अर्धवेळ स्त्री परिचारिकांना किमान वेतन लागू करणे, एन.आर. एच.एम अंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत काम करण्यात येवून सोईसुविधा देण्यात याव्या. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र दोन महिला आरोग्य सहाय्यक देणे, औषधी निर्माण अधिकाऱ्यांना केंद्राप्रमाणे वेतन श्रेणी लागु करावी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Zip Health Service Employees Andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.