जि.प. द्वारे आरोग्य केंद्रांना ६३ ऑक्सिजन काॅन्सट्रेटर उपकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:27 AM2021-05-23T04:27:47+5:302021-05-23T04:27:47+5:30
डाॅक्टरांचे कार्य हे देवासारखे- संध्याताई गुरनुले चंद्रपूर : जिल्हा परिषद येथे कोरोना प्रतिबंधक सर्व दक्षता पाळून घेतलेल्या छोटेखानी ...
डाॅक्टरांचे कार्य हे देवासारखे- संध्याताई गुरनुले
चंद्रपूर : जिल्हा परिषद येथे कोरोना प्रतिबंधक सर्व दक्षता पाळून घेतलेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन काॅन्सट्रेटर उपकरणांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष तथा ,आरोग्य समिती सभापती रेखा कारेकार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनील उरकुडे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोशनी खान, जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरसकोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.प्रकाश साठे उपस्थित होते.
कोरोना विषाणू आजाराचे नियंत्रणाकरिता जिल्हा परिषद,चंद्रपूरचा सुरवातीपासूनच सहभाग राहिलेला आहे. या अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या पुढाकाराने पंचायत विभागामार्फत पंधराव्या वित्त आयोगाचे ५८ लक्ष अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. यामधून ग्रामीण भागातील जनतेस आकस्मिक परिस्थितीत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता ऑक्सिजन काॅन्सट्रेटर उपकरणांची खरेदी करण्यात आली. या उपकरणांचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मागील वर्षीपासून कोविड नियंत्रणाकरिता अहोरात्र झटणारे डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचारी हे देवासारखेच आहेत असे भावपूर्ण उदगार त्यांनी काढले. यावेळी चंद्रपूर तालुक्याच्या तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.माधुरी मेश्राम, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापुर चे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमित जयस्वाल, प्राथमिक आरोग्य केंद्र चिचपल्लीच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रध्दा माटुरवार यांनी साहित्य स्वीकारले.