जि.प. च्या 42 प्रकरणात पंचायत राज समितीकडून ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 05:00 AM2021-02-11T05:00:00+5:302021-02-11T05:00:42+5:30
समिती प्रमुख आमदार संजय रायमुलकर व आमदार किशोर दराडे यांच्या गटाने चंद्रपूर, बल्लारपूर व गोंडपिपरी तालुक्यात पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व कृषी विकास अधिकारी शंकर किरवे उपस्थित होते. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वातील गटात आमदार प्रतीभा धानोरकर, आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे व आमदार अमरनाथ राजुरकर यांचा समावेश होता. या गटाने कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यात पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पंचायत राज समितीने जि. प. च्या लेखापरीक्षा आक्षेपावरील परिच्छेदांची तपासणी केल्यानंतर ४२ प्रकरणात अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवल्याचे समजते. दरम्यान, बुधवारी आक्सापूर आरोग्य उपकेंद्रात मुदतबाह्य औषधसाठा आढळल्याने औषध निर्माताला तात्काळ निलंबित केले.
पंचायत राज समितीच्या पथकाने बुधवारी गोंडपिपरी तालुक्यातील गणपूर येथील जि. प. प्राथमिक शाळेला भेट दिली. दैनंदिन शालेय कामकाज पद्धती, रेकॉर्ड, भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचा आढावा घेतला. त्यामध्ये निष्क्रीय अधिकाऱ्यांवर पंचायत राज समितीने ताशेरे ओढल्याचे समजते.
समिती प्रमुख आमदार संजय रायमुलकर व आमदार किशोर दराडे यांच्या गटाने चंद्रपूर, बल्लारपूर व गोंडपिपरी तालुक्यात पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व कृषी विकास अधिकारी शंकर किरवे उपस्थित होते. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वातील गटात आमदार प्रतीभा धानोरकर, आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे व आमदार अमरनाथ राजुरकर यांचा समावेश होता. या गटाने कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यात पाहणी केली. आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्त्वातील गटात आमदार अनिल पाटील यांचा समावेश होता. त्यांच्याकडून भद्रावती, वरोरा आणि चिमूर तालुक्याची तर आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्त्वात आमदार कैलाश पाटील व आमदार माधवराव जवळगावकर यांनी मूल, सावली आणि पोंभुर्णा तालुक्यात पाहणी केली. आमदार देवराव होळी यांच्या नेतृत्त्वात आमदार कृष्णा गजभे यांनी सिंदेवाही, नागभीड व ब्रह्मपुरी तालुक्याचा दौरा केला. आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील अनियमितता दिसून आल्याने पंचायत राज समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
दुर्बल घटकांच्या योजनांची तपासणी
जि. प. शाळा व आरोग्य केंद्राच्या पाहणीनंतर गोंडपिपरी येथे पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक झाली. राज्य व केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होते की नाही, याची तपासणी केली. कृषी, आरोग्य, सिंचन व दुर्बल घटकांच्या योजनांची माहिती जाणून घेतली.