जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:45+5:302020-12-11T04:21:45+5:30

औरंगाबाद : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. यावर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या ...

1 lakh 46 thousand 317 students will get uniforms in the district | जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

googlenewsNext

औरंगाबाद : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. यावर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थांना प्रत्येकी एक गणवेश शिवून दिला जाणार आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनींना सर्व शिक्षा अभियानातून दरवर्षी गणवेश वाटप केले जातात. गेल्यावर्षी १ लाख ४३ हजार ७७१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशाचे वाटप करण्यात आले होते.

यावर्षी जिल्ह्याला ८ कोटी ७७ लाख ९० हजार २०० रुपयांचा निधी गणवेशासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मंजूर आहे. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने २० नोव्हेंबरला राज्य शासनाने दोन ऐवजी एकच गणवेश वाटपाची सूचना दिली आहे. त्यासाठी १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थांना प्रत्येकी एक गणवेश वाटपासाठी ४ कोटी ३८ लाख ९५ हजार एवढा निधी लागणार आहे. एका ड्रेससाठी सुमारे तीनशे रुपये खर्च अपेक्षित आहे.

---

३ कोटी ४२ लाख रुपये निधी प्राप्त

शासनाकडून सर्व शिक्षा अभियानाकडे ३ कोटी ४२ लाख ६ हजार रुपये निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्यामुळे आणखी ६९.७ लाख रुपये निधीची आवश्यकता भासणार आहे. गणवेश वाटपासंबंधीची संचिका मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांच्याकडे पाठविण्यात आली असून, पुढील प्रक्रिया त्यांच्या निर्णयानुसार होईल, असे सोज्वल जैन यांनी सांगितले.

---

शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच वितरण

शाळा व्यवस्थापन समितीला कापड व शिलाईसाठी निधी दिला जातो. त्यामुळे वितरणाची जबाबदारी शाळातील संबंधित शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती निधी वितरित झाल्यावर कापड खरेदी करतील. स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने अद्याप निर्णय झालेला नाही. निधी समितीकडे वर्ग झाल्यावर कापड खरेदी व विद्यार्थ्यांचे कापड शिवण्यासाठी माप घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.

---

कोट

अद्याप शाळा सुरू नसल्याने विद्यार्थी शाळेत येत नाहीत. गणवेशासाठी मिळालेला निधी ९ तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाला पुरणारा नाही. आणखी ६९.७ लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. तोपर्यंत औरंगाबाद ग्रामीण वगळून इतर ८ तालुक्यांतील शाळा समित्यांना निधी देऊन गणवेश शिवण्याचे व त्यानंतर वितरणाचे काम लवकरच सुरू करू. शाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित निधीही मिळेल. त्यावेळी औरंगाबाद तालुक्यातही गणवेश वाटप प्रक्रिया सुरू करू.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी

---

जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी

--

मुले : ४१,४५७

मुली : १,०४,८६०

---

१,४६,३१७

गणवेश लागणार

---

२,८७,५४२

मागील वर्षी केले गणवेश वाटप

---

Web Title: 1 lakh 46 thousand 317 students will get uniforms in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.