१ लाख ८६ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:35 AM2019-02-28T00:35:17+5:302019-02-28T00:35:44+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा १ मार्चपासून घेण्यात येणार आहे. यात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळातर्फे देण्यात आली.

1 lakh 86 thousand students will be given SSC examination | १ लाख ८६ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

१ लाख ८६ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद विभाग : ६१६ परीक्षा केंद्रे सज्ज; उद्यापासून सुरुवात

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा १ मार्चपासून घेण्यात येणार आहे. यात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळातर्फे देण्यात आली.
शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २२ फेब्रुवारीपासून सुरू आहे. या परीक्षेनंतर सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या दहावीच्या परीक्षेस शुक्रवारपासून (दि.१) सुरुवात होत आहे. या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ६१६ परीक्षा केंद्रांवर १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था, एका वर्गात २५ विद्यार्थी, असे नियोजन करण्याच्या सूचना परीक्षा केंद्र संचालकांना मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी द्वितीय भाषेचा पेपर असणार आहे. या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी मंडळाने ३२ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. यातील ८ भरारी पथके औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ६ भरारी पथके तैनात केली आहेत. याशिवाय महसूल विभागाची बैठे पथके वेगळीच असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिताना शाई बदल, उत्तरपत्रिकांची पाने फाडणे, उत्तराशिवाय इतर मजकूर लिहू नये, याची काळजी घ्यावी, अन्यथा ही विद्यार्थ्यांची गंभीर चूक समजून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंडळातर्फे देण्यात आला.
चौकट

जिल्हा परीक्षा केंद्र विद्यार्थी भरारी पथके
औरंगाबाद २२० ६५,४७७ ८
बीड १५२ ४३,७०१ ६
जालना ८७ २८,८२४ ६
परभणी ९४ ३१,४०६ ६
हिंगोली ५३ १६,६५३ ६
------------------------------------------------
एकूण ६१६ १,८६,०६६ ३२
------------------------------------------------

चौकट
बारावीच्या परीक्षेत ४८ कॉपीबहाद्दर पकडले
बारावीच्या परीक्षेत मंडळातर्फे नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने औरंगाबाद जिल्ह्यात ३७, बीड ६, परभणी जिल्ह्यात ५ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे. आतापर्यंत मंडळाने पाच जिल्ह्यांत १७२ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे.

Web Title: 1 lakh 86 thousand students will be given SSC examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.