जायकवाडीचे १० दरवाजे पुन्हा उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 09:06 PM2017-10-09T21:06:20+5:302017-10-09T21:11:17+5:30

जायकवाडी धरण १०० टक्के भरल असल्याने वरील धरणातून येणारी आवक लक्षात घेता सोमवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता धरणाचे १० दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलून गोदावरी पात्रात ५२९० क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

10 doors of Jaikwadi reopened | जायकवाडीचे १० दरवाजे पुन्हा उघडले

जायकवाडीचे १० दरवाजे पुन्हा उघडले

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊसगोदावरी पात्रात ५२९० क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू

पैठण (जि. औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील
नाशिक जिल्ह्यास परतीच्या पावसाने गेल्या २४ तासांत तडाखा दिल्याने तेथील धरण समूहातून मोठ्या प्रमाणात सकाळपासून विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या जायकवाडी धरण १०० टक्के भरल असल्याने वरील धरणातून येणारी आवक लक्षात घेता सोमवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता धरणाचे १० दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलून गोदावरी पात्रात ५२९० क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गात रात्रीतून वाढ होण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

सोमवारी दिवसभर धरणात ९२०० क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. वरील धरणातून सोडण्यात आलेले पाणी २६ तासांच्या आत धरणात पोहोचणार असल्याने हे पाणी सामावून घेण्यासाठी धरणातील पाणी सोडून पॉकेट तयार करण्यात येत आहे. यामुळे जायकवाडीतून नियंत्रित विसर्ग करता येणार आहे, असे धरण अभियंता चव्हाण यांनी सांगितले. सायंकाळी ६ वाजता धरणाचे द्वार  क्र.१०, १२, १४, १६, १८, १९, २१, २३, २५, व २७ असे एकूण  १० दरवाजे प्रत्येकी ६ इंचाने उचलून ५२९० क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रातही गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणात ९२०० क्युसेक क्षमतेने आवक सुरू आहे.


जायकवाडी १००%
जायकवाडी धरणाची पाणी पातळी १५२२.०० फूट झाली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २९०९.०४१ दलघमी झाला आहे. यापैकी जिवंत पाणीसाठा २१७०.९३५ दलघमी असून धरणाची टक्केवारी १०० % एवढी झाली आहे.


...तर विसर्ग वाढणार
जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात येणाºया औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, कोपरगाव, येवला, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव आदी भागात पाऊस सुरू असून हे पाणी तात्काळ धरणात दाखल होते. या भागात पाऊस वाढल्यास किंवा नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग वाढविल्यास जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवावा लागेल, असे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड यांनी सांगितले.

Web Title: 10 doors of Jaikwadi reopened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.