विद्यापीठ वर्धापनदिनी २४ सुवर्णपदकांच्या मानकऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 01:17 PM2022-08-24T13:17:35+5:302022-08-24T13:18:22+5:30

२०२० मधील ७१, २०२१ मधील ७६ गुणवंतांना पारितोषिकांचे वितरण

10 employees honored with 24 gold medal awards on university anniversary | विद्यापीठ वर्धापनदिनी २४ सुवर्णपदकांच्या मानकऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांचा सन्मान

विद्यापीठ वर्धापनदिनी २४ सुवर्णपदकांच्या मानकऱ्यांसह १० कर्मचाऱ्यांचा सन्मान

googlenewsNext

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त २०२१ जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या परीक्षेत सुवर्णपदक पटकावलेल्या २४ गुणवंत विद्यार्थ्यांसह १० गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या हस्ते मंगळवारी नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी २०२० मधील ७१ आणि २०२१ मधील ७६ रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

कुलपती सुवर्णपदक गीता ठाकूर (एमए हिंदी), पी. आय. सोनकांबळे सुवर्णपदक आणि लक्ष्मीबाई बाबूराव जाधव सुवर्णपदक प्रगती बेलखेडे (एमए मराठी), प्राचार्य एस. टी. प्रधान सुवर्णपदक सागर भिरव (एमए इंग्रजी), स्व. यादवराव पाटील सुवर्णपदक रोहिणी शर्मा (एमएफए), विमलबाई भुजंगराव कुलकर्णी सुवर्णपदक शेख मुस्कान बेगम रहेमान (बीए इंग्रजी), सेठ बिहारीलालजी भक्कड सुवर्णपदक सुधीर साळवे (बीएस्सी), स्व. दयानंद बांदोडकर सुवर्णपदक मोहम्मद इन्सा (एमएस्सी केमिस्ट्री), स्व. डाॅ. के. बी. देशपांडे सुवर्णपदक स्नेहल कोकाटे (एमएस्सी बाॅटनी), डाॅ. यु. एच माने सुवर्णपदक श्रद्धा दायमा (एमएस्सी झूऑलाॅजी) डाॅ. व्ही. एच. बजाज सुवर्णपदक विशाल लोभे (एमएस्सी संस्थाशास्त्र), डाॅ. ज्ञानोबा भाऊराव धायगुडे सुवर्णपदक आणि सुशीलादेवी सुदामकाव जाधव सुवर्णपदक माहा मोहम्मद घालेब हमुद (एमएस्सी गणित), माजी आमदार अप्पासाहेब नागदकर सुवर्णपदक रूपाली दळवी (एमएस्सी काॅम्प्युटर सायन्स), एस. एस. पवार सुवर्णपदक सिद्दिकी असरा सलीम सिद्दिकी (एमएस्सी केमिस्ट्री), वोक्हार्ड सुवर्णपदक, दत्तात्रय व्यंकटेश पेठे सुवर्णपदक शेख अफ्शान अश्फाक (एमबीए), स्वातंत्र्यसैनिक आनंदरावजी *देशमुख# सुवर्णपदक वैशाली लोखंडे (बीई आयटी), बाबूराव बापूराव जाधव सुवर्णपदक पंकजा ढाले (बीई मेकॅनिक्स), मदनलाल सीताराम अग्रवाल सुवर्णपदक स्वप्नाली मगर (बीकाॅम), मोगूलाल अग्रवाल ट्रस्ट सुवर्णपदक स्नेहा अशोक (एमकाॅम), ऐश्वर्या भवर (एम काॅम), ॲड. किशनराव कुलकर्णी सुवर्णपदक अनुजा इंगळे (एलएलएम), स्वामी रामानंद तीर्थ सुवर्णपदक समरीन सदफ सय्यद नुसरत अली (बीएड) यांना देण्यात आले.

लोकमत सुवर्णपदकाचे मानकरी सुदर्शन शिंदे
बॅचलर ऑफ जर्नालिझम या अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्याला दैनिक लोकमत सुवर्णपदक (मेडल ऑफ मेरीट) दिले जाते. यावर्षीचे लोकमत सुवर्णपदक हे उस्मानाबाद येथील बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ काॅम्प्युटर सायन्स ॲण्ड मॅनेजमेंटचे विद्यार्थी सुदर्शन शिंदे यांना प्रदान करण्यात आले.

कर्मचाऱ्यांचा सन्मान
वरिष्ठ सहायक अमोल घुकसे, संजना शिंगाडे, ग्रंथालय सहायक एम. एम. फरताडे, एल. बी. कामडी, कनिष्ठ सहायक व्ही. बी. सूर्यवंशी या पाचजणांनी पीएच.डी. मिळवली, तर कविता तुपे यांनी योग शिक्षकाची पदविका, एस. एम. सूर्यवंशी, रवींद्र पारधी यांनी एम. लिब, भगवान फड यांनी एलएल.बी., लक्ष्मीछाया जहागीरदार यांनी एलएलएम पदवी शिक्षण पूर्ण केले. याबद्दल त्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज वक्तृत्व स्पर्धेतील विजेते प्रथम शेख यास्मीन, द्वितीय वैष्णवी अंभोरे, तृतीय स्नेहल अकोलकर या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

Web Title: 10 employees honored with 24 gold medal awards on university anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.